कलाश्रम परिवाराची दखलपत्रे (Kalashram – Unique way of paying homage)

नंदकुमार आणि नंदिनी पाटील हे मुंबईतील परळचे हरहुन्नरी जोडपे. पैकी नंदकुमार हा पत्रकार – छायाचित्रकार – वर्तमानपत्रात मजकुराची मांडणी आकर्षक करू शकणारा. त्याखेरीज त्याचे इव्हेण्ट मॅनेजमेंट वगैरेंसारखे अनंत उद्योग आणि त्या साऱ्यात नंदिनीची शंभर टक्के साथ. त्याच्या वृत्तीत परोपकार व सेवाभाव घरच्या संस्कारातून मुरले गेले आहेत. त्यामुळे त्याने उद्योग-व्यवसाय म्हणून काही केले तरी ते गुण प्रतीत होतातच. तशाच भावनेतून ती दोघे मिळून पतीपत्नी कलाश्रम नावाची संस्था चालवतात आणि 2018 सालापासून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दखलपत्रे देण्याचा कार्यक्रम करतात.

दखलपत्रे हा नवीनच शब्द मानपत्रेच्या धर्तीवर नंदकुमारनेच योजला आहे. अशी त्याची कल्पकता ठायीठायी दिसते. त्या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे, की तो म्हटले तर श्रद्धांजलीपर कार्यक्रम असतोपरंतु त्यानिमित्ताने चार गुणीजनांच्या गुणांची कदर केली जाते, त्यांचा आदरसत्कार केला जातो. ही अभिनव कल्पना नंदकुमार आणि नंदिनी यांची. त्या त्या महिन्यातील मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ चार गुणीजनांचा गौरव अशी ती कल्पना. त्या महिन्यात कोणत्याही वर्षी मृत पावलेल्या चार व्यक्ती ठरवायच्यात्याच बरोबर विविध तऱ्हेच्या कार्यक्रमांतून प्रकटणारे आणि कमीजास्त प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती निवडायच्या अशी ही पद्धत आहे. उदाहरणार्थ, जून 2025 मध्ये ज्या व्यक्तींचे स्मरण केले त्या व्यक्ती आहेत राम नगरकर, माधव जोशी, दत्ताराम केसरकर, लक्ष्मी रण शेवते आणि त्यांचा सन्मान करण्यात आला त्या व्यक्ती आहेत अशोक परब, रमेश भिडे, हेमंत सावंत आणि मंदाकिनी भट.

तो सत्कार त्यांना दखलपत्रे देऊन म्हणजे त्यांची दखल घेऊन केलेला असतो. ती पत्रे लिहिण्याचे काम कलाश्रम परिवार नवोदित अशा चार हौशी पुरुष-महिलांना देत असतात. ती माणसे त्या गुणीजनांची माहिती जमवून दखलपत्रेलिहितात. दखलपत्रांचे समारंभातील वाचन कलाश्रम परिवारातील चार वेगळी, हौशी नवोदित माणसे करताततसेच, तेच नवोदित पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करतात. ते सगळे पुढे कलाश्रमचे स्वयंसेवक बनतात. प्रत्येक कार्यक्रम एखाद्या मान्यवर व्यक्तीच्या उपस्थितीत होतो. जसे, की या पासष्टाव्या कार्यक्रमात (मे 2025) संगीतकार कौशल इनामदार प्रमुख पाहुणे होते.

दखलपत्रे देण्याच्या या उपक्रमाची सुरुवात परळ येथील शिरोडकर शाळेच्या छोट्याशा वर्गातून झाली. ते कार्यक्रम आता प्रभादेवी येथील .ल. देशपांडे अकादमीतील सभागृहात होतात. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईक व प्रमुख पाहुणे ह्यांच्या हस्ते गुणी व्यक्तींना सन्मानपत्रे दिली जातात.

मे महिन्यातील कार्यक्रमात वामन तावडेकृष्णकांत जाधवभालचंद्र घाडीगावकर व मालविका मराठे या निधन झालेल्या चार व्यक्तींच्या स्मरणार्थ अभय पैरनिशांत शेखरामनाथ थरवळ व शिबानी जोशी या व्यक्तींना सन्मानपत्रे देण्यात आली. प्रमुख पाहुणे कौशल इनामदार ह्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी अशा उपक्रमात त्यांना सहभाग घेता आला याबद्दल समाधान व्यक्त केले. इतकी त्यांना समारंभाची कल्पना आवडली. मात्र ते नुसतेच गोडगोजिरे बोलले नाहीत. त्यांनी सद्य परिस्थितीतील कलाक्षेत्रातील आव्हाने ह्यावर परखड भाष्य केले. पूर्वी विविध कलांना पोषक असे वातावरण होतेपण सध्या प्रत्येक कलाक्षेत्र तिचा टापू सांभाळण्यात व्यग्र-व्यस्त आहे. त्यांनी त्यांच्या गायन या क्षेत्राबद्दल खंत व्यक्त केली, की गायनकला सादर करण्यासाठी पोषक अशी गायन दालन उपलब्ध नाहीत. ती नसल्यामुळे गायनाचे कार्यक्रम उपलब्ध होईल त्या जागेत करावे लागतातत्यामुळे ती कला विकसित होण्याकरता तशा अनुषंगिक घडामोडी होत नाहीत. रसिक प्रेक्षकांच्या मनातील भाव समजून ती कला सादर केली तर ती लक्षणीय ठरते.”

– बिपीन हिंदळेकर 9920485590 bipinh72@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Leave a Reply to Seema Harkare Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here