कल्याणचे अविरत शेटे हे विद्यार्थ्यांचे लाडके ‘अवि सर’ आहेत. ते त्यांच्या जिवाची धन्यता युवापिढी व विद्यार्थी यांना प्रेरणा देण्यात मानतात. ते साहसी आहेत आणि आव्हाने स्वीकारण्यास नावाप्रमाणेच सतत तयार असतात.
सुनील खेडकर या शिक्षकामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी या गावाला ओळख मिळाली आहे. ते तेथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून आले आणि त्यांनी त्या गावचा शैक्षणिक कायापालट केला. पाथर्डी तालुका हा कायम दुष्काळी छायेत असणारा. त्या तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात छोटीशी लोकवस्ती असणारे मौजे जोगेवाडी गाव. तेथून पुढे गेले की बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते.
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा यांच्या नात्यामध्ये, अध्यापन करताना घडणाऱ्या क्रिया-आंतरक्रिया महत्त्वाच्या असतात. शिक्षकांची प्रत्येक हालचाल मुलांचे कौतुक करताना, त्यांना समजावून सांगताना, प्रसंगी चुकल्यास त्यांना दटावताना, बोलत असते.
‘ग्राममंगल’च्या तीन शाळा ह्या नव्या शिक्षणपद्धतीचा ब्रँड आहेत. म्हणजे शिक्षणविषयाची ती संकल्पना जुनी आहे, पण सध्या त्यांबाबतचे औत्सुक्य वाढले आहे. त्या शाळा पाहण्याचा योग आला...
मी लॉकडाऊनच्या काळात रेडिओ विश्वास वर 'समन्वयक' म्हणून काम करू लागले. रेडिओ विश्वास हा कम्युनिटी रेडिओ आहे. तो मोबाईल अॅपद्वारे जगभरात कोठेही ऐकता येतो. त्याचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे.
बाबू चांगदेव मोरे हे पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. बाबू मोरे यांनी ऑर्गेनिक शेतीचा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसांत ठिबक सिंचनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या प्रांगणात यशस्वी करून दाखवला.
मराठी शाळा हा विषय एकूणच आपल्या समाजाच्या स्मरणकक्षेत कितीसा आहे हा प्रश्नच आहे पण मराठी शाळा जगल्या पाहिजेत, या धारणेतून धडपडणार्या कार्यकर्त्यांनी अजूनही आशा सोडलेली नाही.
शिक्षणक्रमात जितकी आधुनिकता येत आहे, जितकी सूट मुलांना दिली जात आहे तितकाच माणसाच्या मनाचा कमकुवतपणा वाढत आहे. उलट, प्रगतीसाठी आत्मविश्वास आवश्यक आहे! मग हा आत्मविश्वास म्हणजे नेमके काय..
रणजित डिसले यांनी क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवली! त्यांचे नाव महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात काही वर्षांपासून गाजत आहे. त्यांना युनेस्को आणि वार्की फाऊंडेशन यांच्यातर्फे जागतिक दर्ज्याचा सात कोटी रुपयांचा ग्लोबल पुरस्कार (2020) मिळाला.
जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते. भारतातील पहिली आणि जगातील तिसरी 'झिरो एनर्जी स्कूल' म्हणून वाबळेवाडीच्या...