सौंदर्यशास्त्र गणिताचे (Aesthetics of Mathematics)
गणित हा शास्त्रीय संगीताइतकाच सौंदर्यपूर्ण आणि अभिजात विषय आहे. ज्याला प्युअर मॅथेमॅटिक्स म्हणजेच विशुद्ध गणित म्हणतात ते म्हणजे मानवी प्रतिभेच्या शिखरांपैकी एक आहे. मात्र शालेय जीवनापासून चुकीच्या पद्धतीने शिकवल्यामुळे म्हणा किंवा शिकल्यामुळे म्हणा; अनेक बुद्धीमान माणसे या बौद्धिक पोषणाला मुकतात. या अवघड वाटणाऱ्या विषयाबद्दल ‘सौंदर्यशास्त्र गणिताचे’ या लेखात सोप्या भाषेत सांगत आहेत, गोव्याचे गणित शिक्षक मुकेश थळी...
मंगल मैत्री : एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या जन्माची गोष्ट
विख्यात गणितज्ज्ञ डॉ. मंगल जयंत नारळीकर यांचे 17 जुलै 2023 रोजी निधन झाले. त्यांच्याविषयीच्या माहितीची नोंद व्हावी या उद्देशाने डॉ. शुभा थत्ते यांच्यासह डॉ. मंगला नारळीकर यांच्या सहा मैत्रिणींनी त्यांच्या आठवणींचे एक पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. ‘मंगलमैत्री’ नावाचे हे पुस्तक डॉ. शुभा थत्ते यांनी संपादित केले आहे. त्या या लेखात पुस्तकाच्या जन्माविषयी सांगत आहेत. जेणेकरून वाचकांना डॉ. मंगला नारळीकर यांचा परिचय होईल आणि पुस्तक वाचावेसे वाटेल...
हबल दुर्बीण
मानवाचा तिसरा डोळा
इटालीत जन्माला आलेल्या गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी, १६१० साली दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीच्या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. दुर्बिणीच्या...
श्रीधर लेले – शास्त्रीय काचमालाच्या संशोधनाची कास !
रत्नागिरी जिल्ह्यातील मुटाट गावातील डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बोरोसिलिकेट ग्लास निर्माण केली. प्रखर उष्णतेला टिकणारी आणि कोणत्याही रसायनांचा परिणाम न होणारी ती काच विज्ञानक्षेत्राला वरदान ठरली !...
गणितीय कूट रचनेचे मर्म (Concept of Mathematical Coherence)
शास्त्रीय संगीताविषयी आणि गणिताविषयी मालिका सुरू करण्याचे उद्दिष्ट हे आहे की काही अमूर्त सौंदर्य कल्पनांपर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर व्हावा. सर्वसामान्यपणे शास्त्रीय संगीताप्रमाणेच गणिताविषयी मनात एक सूक्ष्म अढी असते पण दोन्ही समजल्यावर आंनंद होतो. गणिताविषयीच्या मालिकेत काही संकल्पना आणि काही कोडी अशी जाणीवपूर्वक रचना केली आहे जेणेकरून वाचायलाही गंमत येईल...
लासूरचे आनंदेश्वर शिवमंदिर
लासूर नावाचे खेडेगाव अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रसिद्ध आहे तेथील आंनदेश्वर शिव मंदिरासाठी. आकर्षणाची गोष्ट म्हणजे ते शिवमंदिर आठशे वर्षे जुने, बाराव्या शतकात बांधलेले आहे. मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम. ते मोठमोठ्या शिळांवर कलात्मक रीत्या रचलेले. तो हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो...
धर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था
पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे....
महाराष्ट्रातील जमीनमोजणीचा इतिहास
माणसाचे जमिनीतून उत्पन्न घेणे उद्योगांच्या आधी सुरू झाले. जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणून राज्यकारभार चालवण्यासाठी घेण्याची पद्धत पुरातन काळापासून आहे. जमीन महसुलाची...
गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन
गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे - “... तसेच गडावरी आधी उदक पाहून...
डॅा. रखमाबाई – भारतातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या मानकरी (Dr. Rakhmabai)
आनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 - 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून आल्यावर...