यास्मिन शेख : गेल्या शतकाचा दीपस्तंभ (Yasmin Shaikh- Marathi Grammarian is One Hundred Year...
मराठी व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचा शंभरावा वाढदिवस पुण्यात साजरा झाला. भानू काळे, दिलीप फलटणकर आणि एम. के. सी. एल.चे विवेक सावंत यांच्या पुढाकाराने तो आयोजित करण्यात आला होता. गौरवसमारंभ देखणा झाला. अध्यक्ष होते मिलिंद जोशी. यास्मिन शेख यांच्या कन्या रुमा बावीकर याही उपस्थित होत्या. गेल्या वर्षी त्यांचा नव्याण्णावा वाढदिवस असाच थाटामाटात साजरा झाला होता. दोन्ही वेळी यास्मिन शेख स्वच्छ, स्पष्ट व नि:संदिग्ध बोलल्या. त्या सहज आणि दिलखुलास बोलत होत्या. त्यांच्याजवळ बसलेले फलटणकर आणि रुमा बावीकर (रुक्साना) अधूनमधून त्यांनी भाषणासाठी लिहून आणलेल्या मुद्द्यांकडे यास्मिन शेख यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते...
चोपन्नावे साहित्य संमेलन (Fifty-fourth Marathi Literary Meet – 1980)
प्रा. गंगाधर बाळकृष्ण ऊर्फ अण्णासाहेब सरदार हे बार्शी येथे, 1980 साली झालेल्या चोपन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. सरदार यांनी मराठी साहित्य आणि समाजसुधारणा या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांनी विसाहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये संत साहित्य, समाजसुधारणा आणि महाराष्ट्राचे सामाजिक जीवन यावर आधारित लेखन आहे.सरदार यांनी मराठी संतांचे वाङ्मय, महात्मा गांधींचे साहित्य, कार्ल मार्क्स यांचा ‘कॅपिटल’ हा ग्रंथ, तसेच अन्य वैचारिक वाङ्मय या सर्वांचे वाचन व चिंतन भरपूर केले. सरदार यांना नोकरी पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयात मराठीचे व्याख्याते म्हणून 1941 मध्ये मिळाली. तेथूनच ते मराठीचे प्रपाठक म्हणून 1968 मध्ये सेवानिवृत्त झाले...
ना.ग. गोरे : राजकारण आणि साहित्य
नारायण गणेश गोरे हे नानासाहेब गोरे म्हणून ओळखले जातात. ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील बहुमोल व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला आहे. त्यांची निष्ठा समाजवादी विचारधारेशी कायम राहिली. समाजात समता, न्याय आणि बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य झोकून दिले. नानासाहेबांचे विचार आणि कार्य हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रियेत मोलाचे मानले जातात...
शंकर पळशीकर: एक चिंतनशील कलावंत
शंकर बळवंत पळशीकर हे चित्रकार तर होतेच; त्याबरोबर ते उत्तम शिक्षक आणि प्रतिभावान कलासमीक्षकही होते. त्यांनी उत्तमोत्तम चित्रे निर्माण केली आणि कलेद्वारे कलाप्रेमींसमोर आत्मपरीक्षणात्मक विचार मांडले. त्यांच्या कलासाधनेतून आणि विचारांतून अंतर्मुख, चिंतनशील असा कलाविचार रसिकांसमोर येतो. पळशीकर यांची चित्रे ही दृश्य सौंदर्याच्या पलीकडे जातात. त्यांच्या चित्रांतून वैचारिक संवाद निर्माण होतो. त्यामध्ये पारंपरिक भारतीय रंगछटा, मध्यकालीन भित्तिचित्रांचे प्रभाव आणि आधुनिक कला यांचा संगम दिसतो. त्यांनी अमूर्त चित्रकला स्वीकारली, पण ती केवळ तांत्रिक नव्हती- त्यात जीवन, मन आणि अस्तित्व यांचा खोल शोध होता. त्यांची चित्रे गूढ शांतता प्रस्थापित करतात आणि कलाप्रेमींना विचार करण्यास लावतात...
त्रेपन्नावे साहित्य संमेलन (Fifty-third Marathi Literary Meet – 1979)
त्रेपन्नावे मराठी साहित्य संमेलन चंद्रपूर येथे 1979 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष वामन कृष्ण चोरघडे हे होते. ते विशेषतः लघुकथालेखनासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड या गावी 16 जुलै 1914 रोजी झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी व अर्थशास्त्र या विषयांत पदवी मिळवली. प्राध्यापक व प्राचार्य म्हणून शिक्षणक्षेत्रात कार्य केले. चोरघडे यांना एम ए झाल्यावर वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली...
सुवर्णाला ओढ चिनी भाषेची (Suvarna is fond of Chinese culture)
सुवर्णा साधू-बॅनर्जी या चिनी भाषेच्या अभ्यासक. त्या अरूण साधू यांच्या कन्या. अरूण साधू यांनी प्रथम महाराष्ट्राला ‘आणि ड्रॅगन जागा झाल्यावर’ नावाचे पुस्तक लिहून चीनची ओळख करून दिली. सुवर्णा दिल्लीला चिनी भाषा शिकण्यासाठी गेल्या. त्यांनी दिल्लीच्या जेएनयूमधून चिनी भाषेत मास्टर केले. त्या चिनी अर्थव्यवस्था, चिनी भाषा आणि चिनी जनतेच्या भावना यांसारख्या विविध विषयांवर लेखन करतात. त्यांनी ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्रात ‘चीनचे अंतरंग’ या विषयावर दोन वर्षे सदर लेखनही केले. एरवीही सुवर्णा साधू महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांत लिहित असतात. त्या काही काळ दिल्लीच्या ‘हिंदू’ वृत्तपत्रात नियमित पत्रकारही होत्या...
विनोबांच्या मानसकन्या: कालिंदी सरवटे
कालिंदी सरवटे यांचा मृत्यू 7 एप्रिल 2025 च्या रात्री झाला. त्या विनोबांच्या मानसकन्या. त्यांचे निधन वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी झाले. त्या विनोबा भावे यांच्या अनुयायी, भूदान चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या, लेखिका होत्या. त्या त्यांचे आयुष्य विनोबामय जगल्या. त्या विनोबांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांच्याशी वयाच्या बावीस-तेविसाव्या वर्षी जोडल्या गेल्या. त्यांना सारा विनोबा परिवार ‘कालिंदीताई’ म्हणत असे. विनोबांचा विचारवसा तब्बल सात दशके कालिंदीताई जोपासत होत्या...
जनआरोग्य योद्धा – डॉ.अनंत फडके
पुण्याचे डॉ.अनंत फडके म्हणजे एके काळच्या मागोवा गटात सहभाग असलेला, शहादा श्रमिक-संघटनेच्या चळवळीचा पाठीराखा. त्यांनी लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य चळवळ यांच्यासाठी आरोग्य व आरोग्य-सेवेसंदर्भात आमूलाग्र सुधारणा करण्याकरता शास्त्रीय भूमिका मांडली. त्यांनी 15 एप्रिल 2025 रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत पदार्पण केले. सारे जग पैशांच्या मागे धावत असताना डॉ. फडके यांनी स्वत:ला ‘जनआरोग्य चळवळी’त झोकून दिले आहे. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला नाही. ते ज्या निष्ठेने प्रस्थापित वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींच्या विरुद्ध ठामपणे उभे ठाकले; ते पाहिले, की ते ‘जनआरोग्य योद्धा’ म्हणण्यास खऱ्या अर्थाने पात्र ठरतात...
बावन्नावे मराठी साहित्य संमेलन (Fifty Second Marathi Literary Meet 1977)
पुणे येथे 1977 साली झालेल्या बावन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पुरुषोत्तम भास्कर भावे. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे हे मराठी नवकथेचे एक जनक मानले जातात. त्यांच्या नावावर सतरा कादंबऱ्या, सव्वीस कथासंग्रह, बारा लेखसंग्रह, आठ नाटके असे साहित्य आहे. त्यांनी इतर साहित्यिक कृतीही लिहिल्या व त्या एकूण साहित्यातून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भावे यांना संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव घ्यावे लागले. भावे यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले...
एकावन्नावे साहित्य संमेलन (Fifty First Literary Meet 1975)
कराड येथे 1975 साली भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांना लाभला. दुर्गाबाई लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्ध धर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या होत्या. त्यांचा जन्म इंदूर येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंढरपूरचे. ते नंतर बडोद्याला स्थायिक झाले. त्याकाळी बडोदा हे भारतातील एक संस्थान होते. दुर्गाबाईंचे कुटुंब सुशिक्षित होते. वडील शास्त्रज्ञ होते आणि त्यांची बहीण कमला सोहोनी भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत...