महात्मा गांधीजी आणि व्यंगचित्रे (Gandhi in World Cartoons)
भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहे; तसेच, कुतूहल भारतीय जादूटोणा, तांत्रिक-मांत्रिक, साधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा ‘नंगा फकीर’ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना ‘नंगा फकीर’ ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनी, म्हणजे चर्चिल यांनी...
अहिल्याबाईंच्या गौरवार्थ इंग्रजी पोवाडा (English Ballad in Praise of Ahilyabai Holkar)
अहिल्याबाई होळकर ही मराठ्यांच्या आणि त्यामुळे भारताच्या इतिहासातील एक प्रमुख स्त्री. झाँसीची राणी लक्ष्मीबाई हिच्या बरीच अगोदर आणि बऱ्याच वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या त्या व्यक्तीबद्दल ब्रिटिश समाजातही आदर होता,
महेंद्र प्रताप हीदेखील हाथरसचीच ओळख (Freedom Fighter Mahendra Pratap Also Hails From Hathras)
काय योगायोग आहे, पाहा! काही योगायोग आवडू नये, असे असतात तशातीलच हा. पण त्यामधूनही दिलासा मिळतो! हाथरस नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गेला महिनाभर गाजत आहे.
बुद्धविहार संस्कृतीच्या शोधात… (Integration Of Buddhavihar Culture)
‘बुद्ध विहार समन्वय समिती’ने बुद्ध विहार संस्कृती निर्माण करण्यासाठी 2014 ते 2040 या काळादरम्यान सत्तावीस वर्षांचा कार्यक्रम आखला आहे. पैकी 2014 ते 2020 हा प्रथम चरण पूर्ण होत आला असून त्यात दहा हजार बुद्ध विहारांच्या
समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग (Telang, Social Reformer)
काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1850 रोजी झाला. ते विविध पदांमुळे व त्यास अनुरूप कार्यामुळे ओळखले जातात - प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडित, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक,
रा.गो. भांडारकर – क्रियाशील सुधारक (Great Scholar R.G. Bhandarkar)
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्म व समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते. त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते. म्हणून त्यांना ‘भांडारकर’ हे नाव पडले. त्यांचे आजोबा लाडो विठ्ठल हे शिरस्तेदार म्हणून इंग्रजीत पुढे आले. त्यांचे वडील महसूल खात्यात होते...
दादासाहेब तोरणे : आद्य चित्रपटकर्ते (Dadasaheb Torne)
भारतीय चित्रपटाचे जनक कोण? दादासाहेब फाळके, की दादासाहेब तोरणे असा छोटासा वाद महाराष्ट्रात एकेकाळी होऊन गेला. तो मान मात्र दादासाहेब फाळके यांना दिला गेला. भारताचा पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांचा 1913 मधील ‘राजा हरिश्चंद्र’ हा मानला जातो.
शेषराव घाटगे – पत्रे, देशभक्ताची व प्रेमवीराची (Patriot Sheshrao Ghatage)
शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला...
सरोज जोशी – फिदा स्वतःवर! (Tribute to Saroj Joshi, Poet)
मराठी कवयित्री सरोज जोशी यांना मराठी भाषा दिनी, 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर काहीसा आकस्मिक मृत्यू आला. त्या त्याआधी तीन महिने हॉस्पिटलात होत्या. पडल्याचे निमित्त झाले. त्यांचा मणका दुखावला व त्यांना बेड रेस्ट सुचवण्यात आली आणि त्यांना बिछान्यावर पडून राहवे लागले.
कलावस्तूचा ‘प्रॉडक्ट’ (Rakesh Bhadang)
राकेश भडंग हा अमेरिकेत सॅन होजेला असतो. मूळ नाशिक-पुण्याचा. मी त्याच्या पंचवीस वर्षांपूर्वीच्या कथांमधील अमूर्त संकल्पनांनी मोहून गेलो होतो. तो अमेरिकेत वेबडेव्हलपर-प्रोग्रामर म्हणून केव्हा निघून गेला ते कळले नाही.