वैभव

नोंद गावोगावच्‍या सांस्‍कृतिक संचिताची – ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिक वारशाची!

मुचकुंदी : विशाळगडापासून पूर्णगडापर्यंत !

मुचकुंदी ही कोकणातील नदी. तिला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. तिचा जन्म होतो विशाळगडाजवळ आणि ती समुद्राला मिळते पूर्णगडाशेजारी ! एका गडाजवळ उगम पावत अन्य एका गडाजवळ समुद्रात अंतर्धान पावणारी ही एकमेव नदी असावी. मुचकुंदी नदी अनेक गावांना सुजलाम सुफलाम करत पूर्णगड खाडीत उतरून अरबी समुद्राला मिळते. मुचकुंद ऋषींची गुहा लांजा तालुक्यातील माचाळ या गावात आहे. माचाळ हे गाव ढगांचे माहेरघर, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. गिर्यारोहक माचाळ-विशाळगड असा ट्रेक करतात...

मराठी – अभिजात भाषा !

5
भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले. मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत...

लेणी कोंडाण्याची (Cave Sculpture of Kondana)

0
कोंडाणे लेणी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात त्याच नावाच्या गावात आहेत. बोरघाटातील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट अरण्य आहे. मोठे वृक्ष, महाकाय वेली आणि जंगली श्वापदे यांचा वावर तेथे असतो. त्यात वृक्षवेलींच्या-झाडझाडोऱ्यांच्या गुंत्यात लपल्या होत्या कोंडाणे लेण्यांच्या अप्रतिम शिल्पकृती. लेणी इसवी सनापूर्वी पहिल्या-दुसऱ्या शतकांत साकारण्यात आली. परंतु ती लेणी किर्र रान, मुसळधार पाऊस आणि भूकंप यांनी झालेली पडझड यांमुळे ओसाड होऊन गेली आणि विस्मृतीच्या पडद्याआड सारली गेली...

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर

1
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आलेला चंद्र आकाशात वर येऊ लागतो आणि पूर्वाभिमुख असलेल्या कोपेश्वर मंदिरावर त्याची किरणे पडू लागतात. मंदिर शुभ्रधवल चंद्रप्रकाशाने उजळू लागते. शरद ऋतूमधील आल्हाददायक चैतन्यमय वातावरण आणि त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे उल्हसित करणारे भासते. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री तारकाकृती मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून चंद्रकिरण मंदिरात आत प्रवेश करतात. झरोक्याखाली असलेली रंगशिळा चंद्रप्रकाशात उजळून जाते. वर्षातून एकदा, फक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री काही घटिकांपुरता होणारा हा सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलवतो. हे प्राचीन शिव-विष्णू मंदिर शिल्पकृतींनी संपन्न आहे...

खिद्रापूरचा कोपेश्वर – छोटे खजुराहो !

कोल्हापूरनजीकच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे श्रद्धा व शिल्पकला यांचे उत्तम मिश्रण आहे. तेथील प्राचीन वैभव सुस्थितीत आढळते. शिलाहारांनी अनेक देवळे बांधली, त्यांतील अंबरनाथ, पेल्हार, वाळकेश्वर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक आहे खिद्रापूरचे शिवमंदिर. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्यशास्त्र अशा बहुविषयांना स्पर्श केलेली शिल्पे मंदिरात आहेत...

निफाडचा तांब्याचा मारोती ! (My fascination with deity Maruti… and it’s copper idol)

आमच्या निफाडच्या अकोलखास गल्लीतील मारुती मंदिर माझ्या मनात गच्च रुतून बसलेले आहे. ते मंदिर म्हणजे गल्लीच्या मधोमध दुमजली माडी असलेली पवित्र वास्तू. दगडी जोत्यांवर आणि लाकडी खांबांवर वीटबांधकाम केलेली. मला ते मंदिर चांगले मोठे वाटायचे. मारुती मंदिरात दर्शनासाठी वगैरे भल्या पहाटेपासून लगबग सुरू होई. मंदिर तसे चोवीस तास उघडेच असे. आम्हा मुलांच्या शाळा-कॉलेजच्या परीक्षा असल्या की मुलांचे मंदिरात येणे हे व्हायचेच. “देवा, मला पास कर, चांगले मार्क्स मिळू देत” म्हणून मनोभावे पाया पडणारी मुले हमखास दिसत असत किंवा कोणाशी छोटेमोठे भांडणतंडण झाले किंवा एखादी खुन्नस झाली तर, आम्ही ‘जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली !’ असे काही तरी द्वाडपणे म्हणायचो. आम्ही मारुतीदेवावर कोठलाही भार टाकून निर्धास्त होत असू...

कशेळीचा कनकादित्य (Kanakaditya the sun temple from Kasheli)

0
सूर्यमूर्ती या भारतात इसवी सनापूर्वी दोन शतकांत घडवण्यात येऊ लागली. सूर्याचे देव म्हणून महत्त्व इसवी सनाच्या चौथ्या, पाचव्या शतकात, म्हणजे गुप्त काळात वाढत गेले आणि उपासना मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी या गावी ‘कनकादित्य’ नावाने सूर्य मंदिर प्रसिद्ध आहे. ते मंदिर सुमारे एक हजार वर्षे पुरातन आहे. कशेळी गावाजवळ असलेले आडिवरे गाव मुचकुंदी नदीच्या खाडीच्या मुखाशी वसलेले आहे. आडिवरे या नावाची उपपत्ती आदितवाड म्हणजे जेथे सूर्योपासना होती ते गाव अशी असल्याचे पुरातत्त्व खात्याच्या संशोधन पत्रिकेत म्हटले आहे...

त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्याचे आध्यात्मिक मूल्य (Prof T V Sardeshmukh took criticism to spiritual...

त्र्यं.वि. सरदेशमुख यांची जन्मशताब्दी 2020 साली झाली. त्यांची मुख्य ओळख कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून आहे. त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. त्यांच्या साहित्यकृतीचा लेखक निशिकांत ठकार यांनी लेखस्वरूपात घेतलेला आढावा...

नीतिन वैद्य यांनी रचलेला त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा विचारकोश (T V Sardeshmukh’s world of...

सोलापूरचे नीतिन वैद्य यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक, ‘त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्य- संदर्भ साहित्य : सूची आणि चरित्रपट’ हे पुस्तक व दोन, ‘जवळिकीची सरोवरे’ हे पुस्तक. यांपैकी पहिले पुस्तक सूची वाङ्मयाचे आहे. त्यात सूचिकाराने स्वतः प्रास्ताविक जोडलेले आहे. त्यातून, सूचिकाराने सरदेशमुख यांच्या साहित्याचा शोध कसा घेतला, त्यास कोठे कोठे हिंडावे-फिरावे लागले, आर्जवे-मिनतवाऱ्या कराव्या लागल्या या शोधाची मन पिळवटून टाकणारी कहाणी आहे. त्याने स्वतःच्या शारीरिक मर्यादांची तमा न बाळगता केलेली ती धडपड थक्क करणारी आहे ...

नमन-खेळे : श्रद्धा व नाट्य यांचे मिश्रण (Naman-Khele – Folk art that combines Devotion...

0
नमन-खेळे हा कोकणातील एक लोकनाट्य प्रकार आहे. नमन-खेळे यातील नमन या शब्दाचा अर्थ देवाला नमस्कार करणे, देवापुढे नम्र होणे, देवापुढे वाकणे, लवणे हा आहे. खेळे म्हणजे आराध्य देवतांची भक्ती करताना शक्ती, नृत्यक्रीडा व नाट्य यांचा समन्वय साधून सादर केलेला लोकनाट्यप्रकार. नमन-खेळेच्या आरंभी बारा नमने असतात. देव-देवता, ग्रामदेवता, धरित्री माता, चंद्र-सूर्य, पाच पांडव, सप्तऋषी, सप्तसागर, गुरुस्वामी, दहाखंडकाशी रावण व प्रेक्षक यांना नमन केले जाते...