बोधेगाव येथे भरणारी साध्वी बन्नोमाँ जत्रा हिंदु-मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरी करतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. ती जत्रा १८९८ सालापासून नियमितपणे भरत आहे. अठरापगड जातीच्या लोकांमुळे अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आढळते...
बोधेगावातील ‘बानुबाई’ नामक आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अशी एक मुस्लिम स्त्री म्हणजेच बन्नोमाँ. त्या शिर्डीचे साईबाबा यांच्या समकालीन असून आध्यात्मिक व योगशक्तीच्या धनी होत्या. बन्नोमाँ देवी बोधेगावचे ग्रामदैवत आहे...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर गाव इतर भागांच्या मानाने दोनशे वर्षांपूर्वी खूपच सुधारलेले होते. तेव्हा पंढरी कुटुंबीयांचे अनेक वाडे गावात होते.स्त्रियांनासुद्धा कुटुंबात कसे महत्त्वपूर्ण स्थान होते याचे उदाहरण म्हणजे गीताबाईचा मळा!...
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...
शिदोबाचे नायगाव पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते पुरंदर तालुक्यात आहे. ते सासवड-सुपा रोडवर म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील गाव. गावाचे पाठीराखे...
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...
पुणे जिल्ह्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील गोरेगाव हे माझे गाव. ते तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शंभर टक्के आदिवासी गाव आहे. ‘भीमाशंकर’ हे महादेवाचे मंदिर त्या गावापासून पंचवीस...
भारतातील चालीरीती, व्रते, पूजा या परंपरेने, प्रांतानुरूप, जाती-समुदायनिहाय चालत आलेल्या आहेत. त्या बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे...
वाघनदीचे गोंदिया जिल्ह्याच्या लोकजीवनात महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाघनदीचा उगम छत्तीसगढ राज्यात असून तिच्या उगमस्थानाजवळच्या गावाचे नावच बाघनदी आहे (हिंदीत वाघचा उच्चार बाघ असा केला जातो). बाघनदी हे गाव वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असले तरी वाघनदीचे ग्रामसौंदर्य मात्र त्या गावाने जपलेले आहे...
हेलस नावाचे गाव जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात आहे. ते गाव हेलावंतीनगरी म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध होते. त्याची ओळख ‘पालथी नगरी’ म्हणूनही आहे. कारण तेथे उत्खननात प्राचीन मूर्ती, वस्तू मिळाल्या, त्या जमिनीखाली उलट्या-सुलट्या कशाही असत! म्हणून ती ‘पालथी नगरी’! मात्र तो इतिहासप्रेमींसाठी खजिना आहे. गावाचा सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक वारसा थक्क करणारा आहे...