भावचिन्हांची स्वतंत्र भाषा शक्य? (Will There Be New Language of Emojis)

भावचिन्हे म्हणजे आधुनिक भाषेत ‘इमोजी’. म्हणजेच जगातील तमाम लोक मोबाईलवर दिवसरात्र फेकत असलेले अंगठे, हसरे-रडवे चेहरे, फुले, बदामी हृदये, फुलपाखरू, मोर आणि सूर्य, चंद्र, तारे... काय म्हणाल ते ! जिकडे पाहवे तिकडे ती चिन्हे सध्या जो जोरदार ‘भाव’ व्यक्त करत आहेत त्यामुळे त्यांचा आणि वापरणाऱ्यांचा ‘भाव’ भलताच वाढला आहे ! जसे लेखनात विरामचिन्हे असल्याशिवाय अर्थबोध होत नाही तसे संदेशामध्ये भावचिन्हे असल्याशिवाय ‘भावनाबोध’ होणार नाही अशी संदेश लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची धारणा आहे...

इमोजी : चित्रलिपीच्या दिशेने आरंभ (Emojis Indicate the Direction of New Visual Language)

काही चित्रे लिप्यांमध्ये संगणकीय प्रगतीमुळे आणि विविध गरजांमुळे शिरली आहेत. त्यांना इमोजी म्हणजेच भावचिन्हे म्हटले जाते. ती भावचिन्हे कमीत कमी जागा व्यापून अधिकाधिक अर्थ व्यक्त करणारी असतात. त्यांच्या आधारे आधुनिक संदेशन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे, म्हणजेच अनेक चित्रे लिपीत शिरू लागली आहेत आणि त्यांच्या परिणामकारकतेमुळे त्यांचा वापरही वाढू लागला आहे...

मागील पिढीवरील वाचन संस्कार (Reading – key to the personality development)

4
मराठी भाषाभ्यासासाठी वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे वगैरे दिग्गजांनी संपादित केलेली पाठ्यपुस्तके जुन्या पिढीत होती; खेरीज पुरवणी वाचनासाठी नेमलेली अवांतर पुस्तके असत. त्यातील गद्य विभाग हे गद्य बिलकुल नव्हते, तर अतिशय रोचक आणि समृद्ध होते. त्यातील साहित्याची विविधता तेव्हा जाणवली नाही, पण आता ती आठवली, की स्तिमित व्हायला होते.

नूरजहान – महत्त्वाकांक्षी आणि लावण्यवती (Noorjahan – As Marathi writers saw her over hundred...

0
मोगल साम्राज्यातील जहांगीर आणि नूरजहान यांची माहिती त्या नावांपलीकडे इतिहासात फारशी नसते, पण नूरजहानचे चित्र मात्र क्रमिक पुस्तकात हमखास असायचे. नूरजहान म्हणजे अनारकली आणि ‘मोगल- ए- आझम’ या चित्रपटाची नायिका हा समज सार्वत्रिक म्हणता येईल एवढा मोठ्या प्रमाणावर दिसतो.

अफूबंदीची अद्भुत कहाणी (The Truth About Opium Smoking)

गोष्ट आहे 1882 सालची. लंडनच्या एक्स्टर सभागृहात एक परिसंवाद आणि त्यानंतर एक जाहीर सभा झाली. त्या परिसंवादात आणि नंतरच्या सभेत जे सहभागी झाले होते त्यात नऊ मिशनरी, काही ब्रिटिश अधिकारी, बिशप, आर्चबिशप आणि काही खासदार होते.

ताम्हनकर यांचा खेळगडी – गोट्या (Tamhankar’s literary character Gotya becomes popular TV serial)

'गोट्या' नावाची मालिका मुंबई दूरदर्शनवर सुमारे तीस वर्षांपूर्वी गाजून गेली. ती मालिका पाहताना त्या काळातील लहान मुलेच नव्हे तर मोठी माणसेही एका वेगळ्याच विश्वात दंग होऊन जात !

ना. धों. ताम्हनकर यांचे नाटक – उसना नवरा (Usana Navara – Na Dho Tamhankar’s...

1
‘गोट्या’ या मुलांसाठीच्या लोकप्रिय कथामालिकेचे लेखक ना.धों. ताम्हनकर हे बालवाङ्मय लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी ‘गोट्या’व्यतिरिक्त लिहिलेले बालवाङ्मय... चिंगी, दाजी, खडकावरील अंकुर, अंकुश, बहीणभाऊ, नीलांगी, अविक्षित, मणी, रत्नाकर, नारो महादेव अशी भलीमोठी यादी आहे.

तालुक्या तालुक्यांतील नवजागरण! (Renaissance like movement in the villages of Maharashtra)

महाराष्ट्र हा प्रदेशच कर्तृत्वाचा आहे हे गेल्या आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. त्याचे कारण महाराष्ट्र हा प्रदेश संमिश्रतेचा आहे – संकराचा आहे; देश-परदेशांतून आलेल्या स्थलांतरितांचा आहे. तो महानुभावांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, शिवाजीमहाराजांचा आहे...

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)

10
भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तस तसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते...

शतकापूर्वीची रहस्यकथा आणि तिचे अज्ञात जनक (Mystery of an Old Time Suspense Story Writer)

5
रहस्यकथा म्हटले, की मराठी भाषेच्या संदर्भात नावे आठवतात ती बाबुराव अर्नाळकर, नारायण धारप, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर यांची. परंतु त्या सर्वांच्या अगोदर मराठीत गोविंद नारायणशास्त्री दातार (1873-1941) यांनी काही रहस्यपूर्ण कादंबऱ्या लिहिल्या.