सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले...
मिसेस फेरार नावाच्या बार्इंनी 1838 साली तेव्हाच्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’च्या सभासदांच्या प्रोत्साहनाने आणि सूचनांनी ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ नावाचे पाठ्यपुस्तक लिहिले. ते बराच काळ भारतातील शाळांमधून शिकवले गेले...
निबंधात जसा नुसता निबंध, लघुनिबंध, ललित निबंध असा प्रवास झाला आहे, त्याप्रमाणे ‘गंध अंतरीचा’ हे आहे भानू काळे यांचे ललित चिंतन. काळे हे मराठीतील आघाडीचे लेखक...
सूथबी या जगप्रसिद्ध लिलाव कंपनीने थॉमन व विलियम डॅनियल या काका-पुतण्यांच्या जोडीने लिहिलेल्या प्रवासवर्णनपर पुस्तकाची विक्री केली आणि लिलावात त्या पुस्तकाला तीन लाख सदतीस हजार पौंडांहून अधिक (भारतीय चलनात दोन कोटी सत्तर लाख रुपये) एवढी किंमत आली !...
‘अनुपमा’ हे अनागारिका माताजी अनुत्तरा म्हणजे पूर्वाश्रमीच्या अनुपमा अर्जुन बोरकर लिखित आत्मकथन आहे. ते आंबेडकरी चळवळीतील स्त्री आत्मभान जपणारे पुस्तक आहे. त्यात आंबेडकरी चळवळ, शैक्षणिक परिवर्तन, सामाजिक-धार्मिक परिवर्तन यांचा ऐतिहासिक संदर्भ येतो आणि त्यामुळे ते महत्त्वाचे ठरते...
किरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर (नाशिक) येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांचे ‘शनिखालची चिंच’ नावाचे पुस्तक ई-साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले. त्यात त्याच नावाच्या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला...
इंदुताई पाटणकर व त्यांचे पती बाबूजी ऊर्फ विजय हे दोघेही रोजनिशी लिहून ठेवत. ती दोघे चळवळीनिमित्त एकमेकांपासून लांब राहत असल्यामुळे त्यांच्यात नेहमी पत्रव्यवहार असे. तसेच मायलेकांचाही पत्रव्यवहार होत होता. त्यांचा लेक भारत पाटणकर. तो संपूर्ण पत्रव्यवहार भारत यांनी सांभाळून ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी त्यांची आई ‘क्रांतिवीरांगना इंदुताई’ असे एक पुस्तक लिहिले. पुस्तक असे लिहिले, की जणू काही त्या स्वतः वाचकांशी बोलत आहेत...
संजय वाघ यांना ‘साहित्य अकादमी’चा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीसाठी तो पुरस्कार दिला गेला आहे. ते नाशिकचे पत्रकार आणि साहित्यिक आहेत. दरवर्षी जाहीर होणाऱ्या ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्कारांतून नाशिकच्या वाट्याला आलेला साहित्य अकादमीचा बाल साहित्यातील हा पहिला पुरस्कार आहे...
‘वावटळ’ हा प्राध्यापक द.के. गंधारे यांचा पहिला काव्यसंग्रह कवितेच्या दालनात आत्मविश्वासाने प्रवेश करतो. ‘वावटळ’मधील कविता ग्रामीण वास्तवाला साक्षात करते. काटेवनाची मोठी अरण्ये जागतिकीकरणानंतर झाली आहेत. त्यांतील अडचणींच्या वावटळींनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तीच वावटळ गंधारे यांच्या कवितेतून साकार झाली आहे. कवी बालपणापासून ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवांनी त्याच्या कवितांत प्रातिनिधिक रूप धारण केले आहे...
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.