साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

_Daya_Pawar_3.jpg

बलुतंची चाळिशी आणि ग्रंथालीची सार्थकता

एखाद्या साहित्यकृतीची पंचविशी-चाळिशी-पन्नाशी किंवा शतक महोत्सव साजरा होण्याचे भाग्य जगात फार कमी साहित्यकृतींच्या वाट्याला आले आहे. मराठीत तर ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे....
_Daya_Pawar_3.jpg

दया पवार यांच्या बलुतंची चाळिशी!

0
पुस्तकाची चाळीशी! अशी घटना मराठी साहित्यविश्वात बहुधा प्रथम घडत असावी. दया पवार यांच्या ‘बलुतं’ला चाळीस वर्षें झाली. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’, ‘दया पवार प्रतिष्ठान’ व...

बलुतं – एक दु:खानं गदगदलेलं झाड!

‌मनुष्यसमाज, निसर्ग आणि नियती यांनी निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या दु:खांनी गदगदलेल्या दगडू मारुती पवार नावाच्या माणसाची ‘बलुतं’ ही एक आत्मकथा आहे. महार जातीच्या आई-वडिलांपोटी...

रावण – राजा राक्षसांचा

मी स्वत:ला काही प्रश्न कोठलेही पुस्तक वाचून झाल्यावर विचारतो, की या पुस्तकातून मला काय घेता आले ? या पुस्तकाने मला काय दिले? कधी कधी उत्तर सापडत नाही, पण तरीही त्या पुस्तकाने मनाचा ठाव खोलवर कोठेतरी घेतलेला असतो, ‘रावण - राजा राक्षसांचा’ या लेखक शरद तांदळे यांच्या कादंबरीबाबतही तसेच घडले. मी ती कादंबरी तीन वेळा वाचली, पण ती मला प्रत्येक वेळी नवीनच भासली! सर्व पात्रांची ओळख पुन्हा नव्याने होत गेली...
_ShodhaMaharashtracha_1.jpg

किलर इन्स्टिंक्ट ही मराठ्यांची उणीव? (Lack of Killer Instinct in Marathas?

0
महाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचकाला गो.स. सरदेसाई, त्र्यं.श. शेजवलकर, वि.का. राजवाडे, ढवळीकर, सेतु माधवराव पगडी इत्यादी इतिहास संशोधकांनी लिहिलेले साहित्य वाचावे...
_MaharachyaBechalis_BhashancheLoksarvekshan_1.jpg

महाराष्ट्राच्या बेचाळीस भाषांचे लोकसर्वेक्षण

गणेश देवी यांच्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ ‘महाराष्ट्र’ या खंडात जवळपास बेचाळीस भाषा सर्वेक्षक व चर्चक यांचे प्रयत्न समाविष्ट आहेत. त्यांचे विभाग संपादक अरुण जाखडे...
_HemantKarnik_YnacheHatkeVicharvishw_1.jpg

हेमंत कर्णिक यांचे हटके विचारविश्व

0
हेमंत कर्णिक यांचे ‘अध्यात आणि मध्यात’ हे पुस्तक म्हणजे 1980-90 च्या काळात ‘आपलं महानगर’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. लेखकाने त्या काळातील...

वैराग्यवारी – परतवारी

पंढरपूरकडे जाणारी वारी ही ऐश्वर्यवारी असते. वारकऱ्यांची सोय गावोगावचे लोक, स्वयंसेवी संस्था, मंडळे करत असतात. दान देण्याची प्रवृत्ती त्या काळात दिसून येते. चहा, अल्पोपहार, फळफळावळे, उपवासाचे पदार्थ, पाणी यांचे वाटप सतत चालत असते. त्यामुळे वारीत श्रद्धाळू असतात तसे पोटार्थीही दिसून येतात. त्या दिंड्या परत कधी फिरतात? त्यांची व्यवस्था काय असते? परतीचा प्रवास किती दिवसांत होतो? किती लोक पालखीबरोबर असतात? या प्रश्नांची उत्तरे देणारे एक पुस्तक सुधीर महाबळ यांनी लिहिले असून ते पुण्याच्या ‘मनोविकास प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे नावच ‘परतवारी’ असे आहे...
_Aanandvan_Prayogvan_1.jpg

अंतर्मुख करणारे आनंदवन प्रयोगवन

ही कथा आहे एका ध्येयवेड्या माणसाची. त्याने पाहिलेल्या स्वप्नाची. ती कथा त्या माणसाची (एका व्यक्तीची) न राहता, त्याच्या तीन पिढ्यांची आणि सध्या वाढत असलेल्या...
-atal-bihari

अटलबिहारी वाजपेयी- स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान!

‘अटलजी-कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ हे पाचशेतीस पानांचे पुस्तक पत्रकार सारंग दर्शने यांनी लिहिलेले आहे. अटलजी चौऱ्याण्णव्या वर्षांचे असून भीष्मासारखे शरपंजरी पडलेले आहेत; तरीही त्यांची लोकप्रियता...