हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.
‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते. ‘ख’ म्हणजे आकाशात, ‘ग’म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी).
अक्षता हा शब्द सर्वांच्या अगदी चांगला परिचयाचा! लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी...
मेहनत म्हणजे कष्ट, श्रम; त्याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ त्या शब्दाचे आहेत. मेहनत हा शब्द खूप प्रयत्न, अभ्यास, रियाझ या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ,...
अभिनेत्री म्हणजे नटी, अॅक्ट्रेस. अभिनेत्री हे अभिनेता या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. म्हणजे अभिनेता हा (पुरुष) नट, तर अभिनेत्री ही (स्त्री) नटी. ‘नेतृ’...
पुढारी मंडळींना नेहमी प्रकाशात राहवे लागते. अन्यथा लोक त्यांना विसरून तर जाणार नाहीत ना, अशी चिंता त्यांना सतत लागून राहिलेली असते. त्यामुळे अनेक जण...