इंदापूरचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याप्रमाणेच अनेक ब्राह्मण कुटुंबीयांची स्वतःची खाजगी मंदिरे तेथे आहेत.व्यंकटेशाचे मंदिर इंदापूरमधील सर्वात पुरातन आणि श्रीमंत मंदिर असावे...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर गाव इतर भागांच्या मानाने दोनशे वर्षांपूर्वी खूपच सुधारलेले होते. तेव्हा पंढरी कुटुंबीयांचे अनेक वाडे गावात होते.स्त्रियांनासुद्धा कुटुंबात कसे महत्त्वपूर्ण स्थान होते याचे उदाहरण म्हणजे गीताबाईचा मळा!...
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या जकेकूर गावातील मशिदीच्या बांधकामाला चक्क ‘विठ्ठला’चा हातभार लागला आहे! जकेकूरमध्ये सदुसष्ट वर्षीय विठ्ठल पाटील यांच्या पुढाकारातून भव्य मशीद बांधण्यात आली...
शिदोबाचे नायगाव पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते पुरंदर तालुक्यात आहे. ते सासवड-सुपा रोडवर म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील गाव. गावाचे पाठीराखे...
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...
भारतातील चालीरीती, व्रते, पूजा या परंपरेने, प्रांतानुरूप, जाती-समुदायनिहाय चालत आलेल्या आहेत. त्या बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे...
भारतीय राज्य घटनेत अनुसूचित जाती म्हणून काही जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या जातींचा उल्लेख सर्वसामान्यपणे दलित असा दैनंदिन भाषाव्यवहारात केला जातो. अनुसूचित जातींचे...
गावपळणीची प्रथा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे पंचक्रोशीत आहे. आचऱ्याला लागून असलेल्या वायंगणी, चिंदर, मुणगे आदी गावांतही दर तीन ते चार वर्षांनी गावपळण...
कोरलई हे रायगड जिल्ह्यातील रेवदंड्याच्या खाडीच्या पलीकडे असणारे छोटेसे गाव. ते अलिबागपासून बावीस किलोमीटरवर आहे. ते रेवदंड्याच्या खाडीत घुसलेल्या भूभागावर वसलेले आहे. कोकण किनारपट्टीवर...
हेलस नावाचे गाव जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात आहे. ते गाव हेलावंतीनगरी म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध होते. त्याची ओळख ‘पालथी नगरी’ म्हणूनही आहे. कारण तेथे उत्खननात प्राचीन मूर्ती, वस्तू मिळाल्या, त्या जमिनीखाली उलट्या-सुलट्या कशाही असत! म्हणून ती ‘पालथी नगरी’! मात्र तो इतिहासप्रेमींसाठी खजिना आहे. गावाचा सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक वारसा थक्क करणारा आहे...