शरद पवार यांचे राजकारण आणि समाजकारण बहुआयामी आहे. त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ही महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनची आहे. त्यांतील संगती-विसंगती अनेकांना गोंधळात पाडते, तरी त्यांच्या अनेक भूमिका या त्यांच्या संस्थात्मक कामांमुळे लोकांच्या मनात टिकून राहिल्या आहेत. त्यामध्ये महिला धोरण, फळबागांना प्रोत्साहन, लातूर भूकंपनिमित्ताने आपत्ती निवारण व्यवस्था अशा महत्त्वाच्या बाबी येतात.