Home अवांतर

अवांतर

कलेक्टरची मुलगी

-  भाऊसाहेब चासकर तमिळनाडूतील एका तरूण जिल्‍हाधिका-याने आपल्‍या मुलीला पंचायत समितीच्या सरकारी शाळेत दुसरीच्या वर्गात घातले. जिल्हाधिका-यांनी मुलीच्या प्रवेशासाठी आपल्याच शाळेची निवड कशी काय...
carasole

अक्‍कलकोटच्‍या राजवाड्यातील शस्‍त्रागार

अक्कलकोट नगरीला तीनशे वर्षांपासूनचा भोसले कुळाचा संस्थानी इतिहास आहे. त्याच्या खुणा नवाजुना राजवाडा, ऐतिहासिक मंदिरे, राजघराण्याची स्मारके यांतून या नगरीत अद्यापि दिसतात. त्यातील भोसल्यांचे...

देवीदेवतांपासून भ्रष्टाचार

0
निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडवला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी एक शारीरिक विशेष गुण किंवा अवयव दिला आहे. मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही. त्याऐवजी त्‍याला बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा देऊन टाकले आहे! आणि इथेच खरी मेख आहे. हे व्यक्तीनिहाय स्वातंत्र्य हेच मानवजातीच्या सबंध वर्तनाचे आणि गैरवर्तणुकीचे कारण ठरले आहे, आणि या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे...
आसाराम बापूंची आध्‍यात्मिक होळी

आसारामबापू की शिरपूर पॅटर्न?

     आसारामबापू यांनी नागपूर व नवी मुंबई या ठिकाणी पाण्याची उधळपट्टी केल्यामुळे टीकेची झोड उठली व ती रास्तच आहे. होळीचे निमित्त करून सार्वजनिक ठिकाणी...
विजय तेंडुलकर

मूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग

     समाज मानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात मध्यंतरी प्रसिद्ध झाली. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग कसा कारणीभूत आहे यावर...

कोकणातील जलव्यवस्था

कोकणामध्ये कणकवली येथे भरलेल्या सिंचन विकास परिषदेतून गावाच्या परिसरात पूर्वी पाण्याच्या काय व्यवस्था असत ते स्पष्ट झाले. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार पाणवठे होते. काही ठिकाणी बोगदे काढून पलीकडच्या घळीमधील पाणी वळवले गेले होते. त्या सर्व पाण्याच्या व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. पण त्यांच्या अवशेषांमधून एकंदर भारताच्या विविध भागांत समाजजीवनाची पाण्याच्या संदर्भातील व्यवस्था कशी होती याचे संकेत मिळतात...

मौजिबंधन विधी – परंपरा व सद्यस्थिती

विलास पंढरी यांनी ‘मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार – मौंजिबंधन’ नावाचा सविस्तर लेख लिहिला आहे. संस्कार म्हणजे भारतीय संस्कृतीतील वागण्या-बोलण्याचे नीतिनियम. असे सोळा संस्कार भारतीय परंपरेत आहेत. त्यांचा आशय समजून घेणे आवश्यक आहे. व्यक्तीला तो समजला तर त्यानुसार आचरण करून ती स्वत:चे व्यक्तिमत्त्व समृद्ध करू शकते. यानिमित्ताने उपनयन विधी संदर्भात वेगवेगळ्या घटना व विचार यांचे संकलन असलेले चार लेख प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या लिंक लेखांचे पुढे वर्णन आहे त्या ठिकाणी लिंक दिल्या आहेत...

वाचनालयाचे स्वप्न!

गाव शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर . तीस वर्षांपूर्वी, गावची लोकवस्ती पाच-सहा हजार असावी. मी सहावी-सातवीत असेन. गावात मारुतीच्या देवळात राजर्षी छत्रपती शाहू वाचनालय होते....
carasole

प्रकाश कामत यांचा ध्वनिमुद्रिकांचा खजिना

छंद हे सहसा 'स्वांत सुखाय' असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक...

महाराष्ट्र टिकला पाहिजे

0
महाराष्ट्र टिकला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे असे मला मन:पूर्वक वाटते. ते भाषा आणि विकास या दोन पायांवर  शक्य होईल असा मला विश्वास आहे. त्यासाठी भाषा, समाज आणि संस्कृती या तीन घटकांचा नव्या संदर्भात विचार केला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र समितीला ती संधी होती, पण राजकीय दुफळीमुळे त्यांना ते जमले नाही. शिवसेनेचे एकूण महाराष्ट्राबद्दलचे आणि भाषिक राजकारणाबद्दलचे आकलन मर्यादित असल्याने त्यांनी या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा गांभीर्याने विचारच केला नाही. मनसे याबाबत सुरुवातीला आश्वासक वाटली होती. पण राज ठाकरेंचे विदर्भात सार्वमत घ्यावे असे एखादे विधान सोडले तर तो पक्ष (किमान प्रकटपणे) सक्रियपणे विदर्भाचा विचार करतो असे दिसत नाही. प्रतीकात्मक राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन अधिक समग्रपणे महाराष्ट्राचा विचार करायचा तर राज्यांतर्गत सत्तावाटपाचा आणि केंद्र-राज्य संबंधांचाही पुनर्विचार करावा लागेल. अशा अस्मितेला अस्पृश्य न मानणार्‍या ज्ञानाधिष्ठित चळवळीची  महाराष्ट्राला गरज आहे. मी त्याला ‘मराठीकारण’ (मराठीकरण नव्हे) म्हणतो. असे मराठीकारण उभे राहणे आणि पुरोगाम्यांनीही त्यापासून  ‘पल्ला न झाडणे’ ही या विचारमंथनाची योग्य निष्पत्ती ठरेल...