वसई चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत! (Bells From Vasai church in Hindu Temples)
चिमाजी अप्पांनी वसई परिसरातील किल्ले पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यानंतर तेथील वेगवेगळ्या चर्चमधून ज्या घंटा मिळाल्या त्या महाराष्ट्रातील विविध मंदिरांत नेऊन बसवण्यात आल्या आहेत. फादर कोरिया...
अनंत भालेराव – लोकनेता संपादक
‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार...
साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे धर्मगुरू म्हणून वसईत गेल्या बावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून ते त्यांच्या नावापुढे मोन्सी असे लिहितात. तो कोणाही धर्मगुरूसाठी मोठा बहुमान आहे! मॉन्सेनियर कोरिया हे धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख लेखक म्हणून आहे. त्यांनी आजवर बत्तीस पुस्तके लिहिली आहेत. ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’, ‘मधाच्या घागरी’; तसेच, त्यांनी वसई किल्ल्यांतून नेलेल्या व आता हिंदू तीर्थक्षेत्री असलेल्या अडतीस घंटांचा शोध नऊ जिल्ह्यांत जाऊन लावला. त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे...
छंदमय जीवन जगणारे शिक्षक – शंकर माने
शंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या...
विभावरी बिडवे यांचे खाद्यकॅलेंडर
आषाढाचा पहिला दिवस माझ्यासाठी वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा असतो. खरे तर, महाकवी कालिदास यांच्या नावाचा दिन. पण माझे खाद्यकॅलेंडर त्या दिवसापासून सुरू होते. आषाढातील संततधार...
मराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश… डेडली कॉकटेल!
अरुण साधू कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वैचारिक राजकीय व सामाजिक लेखनही बरेच आहे. साधू स्वत: उत्तम वाचक, आस्वादक आणि संपादक होते. त्यामुळे त्यांची...
ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल...
वि.का. राजवाडे – विद्वान संशोधक (V.K. Rajwade – Researcher)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन...
सट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा
बसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे... ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची...
अभिनेत्री
अभिनेत्री म्हणजे नटी, अॅक्ट्रेस. अभिनेत्री हे अभिनेता या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. म्हणजे अभिनेता हा (पुरुष) नट, तर अभिनेत्री ही (स्त्री) नटी. ‘नेतृ’...