Home सांस्‍कृतिक नोंद

सांस्‍कृतिक नोंद

बैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना

0
शंभर वर्षांपूर्वी घोडागाडी, बैलगाडी चालवण्यासाठी परवान्याची सक्ती होती. तो परवाना जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सहीने दिला जाई. तसेच, घरात रेडिओ लावण्यासदेखील परवाना आवश्यक होता. त्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागे...

यशोगाथा, पाणीदार धोंदलगावची…

0
वैजापूरमधील धोंदलगावाने गेली पंचेचाळीस वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्या गावात आनंद असोलकर या जादूगाराने येऊन गावातील नागरिकांना पाणी अडवण्याचे महत्त्व समजावले आणि ते फक्त लोकसहभागातून शक्य आहे ही भावना त्यांच्या मनी बिंबवली...

पंचांग – टिळक की दाते (Lokmanya Tilak Reforms Indian Traditional Almanac)

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे...

गायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता

0
माणसाच्या बाबतीत, माय स्वत:च्या बाळाला अंगावर दूध पाजते. बाळाला ती स्तनपान करते. निसर्गाने बाळासाठीच आईच्या शरीरात ती योजना केली आहे. मग गाय, म्हैस यांचेही दूध, खरे तर, त्यांच्या बाळांसाठीच असण्यास हवे ना ? परंतु आधुनिक काळात भावना नष्ट होत आहेत...

श्रीक्षेत्र नारायणपूर – नारायणेश्वराचे मंदिर (Narayaneshwar Temple of Narayanpur)

नारायणपूरचे नारायणेश्वर मंदिर यादवकालीन आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण ते पश्चिमाभिमुख मंदिर आहे. तेथे गर्भागृहात स्वयंभू शिवलिंग आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीस पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा जन्म

0
दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराची पिंडी एका ढिगातून वर आली. ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला. त्यामुळेच त्या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले. ब्रिटिश कालीन ह्या मंदिराचा 2015 साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात असलेला नक्षीदार घुमट, मंदिरासमोरील त्रिपुर यामुळे मंदिरा भोवतीचे वातावरण तेजोमय वाटते...

गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)

भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे...

हेल्यांची टक्कर इतिहासजमा ?

1
चौगाव गावी दिवाळीला कोणत्या हेल्यांची टक्कर लावायची हे आधीच ठरवलेले असायचे. ठरावीक लोकांकडचे हेले टक्करीसाठी तयार केलेले असायचे. सुरुवातीस, दोन्ही हेले एकमेकांचा अदमास घेत एकमेकांभोवती फिरायचे. शेवटी, एकमेकांचे डोके एकमेकांना भिडायचे. लोक हुर्यो करून ओरडायचे. हेल्यांना चेव चढायचा. कोणी डोक्याची ताकद वापरायचा तर कोणी शिंगांचा वापर करायचा...