संस्था

महाराष्‍ट्रातील सामाजिक उपक्रमांचा – संस्‍थात्‍मक कार्याचा आढावा!

अंधांना डोळे आणि डोळसांना दृष्टी – अत्याळची चळवळ

‘नेत्रदान’ हे श्रेष्ठ दान आहे ही जाणीव गडहिंग्लज तालुक्याच्या ‘अत्याळ’ गावातील लोकांमध्ये जागी झाली आहे. तेथे गेल्या दहा वर्षांपासून (2012) ‘अंधांना डोळे व डोळसांना दृष्टी’ या ब्रीदवाक्यावर आधारित चळवळ सुरू आहे. कौतुक म्हणजे अत्याळमधील चळवळीशी वर्षागणिक नवी गावे जोडली जात आहेत. चळवळीच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या गावांतून अकरा वर्षांत शहाण्णव जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे ! परस्परांपासून दुरावत चाललेली माणसे एकमेकांना जोडली जावीत ही भावना हा चळवळीचा गाभा होऊन गेला आहे. ज्या अंधांना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी मिळू शकत नाही अशा दृष्टीहीनांचा समाजातील वावर सुकर व्हावा म्हणून कार्यशाळा आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केंद्र असे जादा उपक्रमही चळवळीमार्फत चालतात...

आगोम : निरामय सूक्ष्म औषधांचा वसा (Story of ‘Agom’ medicines)

0
ही गोष्ट आहे 1994 सालची. ‘गुटिका केशरंजना’ची धून आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागली आणि ‘आगोम’ हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले ! ‘आगोम’चे गूढ त्याच्या नावापासून सुरू होते, पण लोक आकृष्ट झाले ते त्या गुटिकेमुळे, ‘डोक्याचे केस शाबूत राहतात’ या प्रभावाने. ‘आगोम’ हे औषधालय रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी एका छोट्याशा खेड्यात वसले आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे हे ते गाव. ते सध्या कासव महोत्सवामुळेही गाजत आहे...

थॅलेसेमियासाठी साथ ट्रस्ट (Saath Trust For Thalassemia)

1
सुजाता चेतन रायकर या ‘थॅलेसिमिया’ या रक्ताच्या गंभीर आजाराविषयी जनजागृती करतात आणि तो आजार झालेल्या निवडक मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सर्वतोपरी ‘साथ’ देण्याचे काम करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, थॅलेसिमियाविषयी जनजागृती करणे हाच प्रतिबंधात्मक उपाय त्या आजारावर आहे. कारण त्या रोगप्रसाराचा लग्न या विषयाशी घनिष्ट संबंध आहे. त्याकरता सुजाता शाळा-महाविद्यालयांत जाऊन मुलांशी गेली दहा वर्षें संवाद साधतात. त्यांना रक्ततपासणीस व रक्तदानासही प्रवृत्त करतात...

एड्सग्रस्तांना जपणारी जाणीव ! (Couple recovered from Aids helps the Community to stand...

कोल्हापूरच्या सुषमा बटकडली आणि रघुनाथ पाटील या दोघांनी, ती दोघे स्वत: एड्ससह आयुष्य जगत असताना एकत्र येऊन ‘जाणीव’ या संस्थेची स्थापना केली. ती दोघे एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना औषधोपचाराविषयी मार्गदर्शन आणि महाविद्यालयांमधून एड्सविषयी जनजागृती असे काम करत आहेत. त्याखेरीज त्यांनी एड्स रुग्णांसाठी तात्पुरते आसरा स्थळ चालवले आहे...

फलटणचे दीडशे वर्षांचे वाचनालय (Phaltan public library celebrates 150 years of its foundation)

फलटण संस्थानामध्ये एकोणिसाव्या शतकात वाचनालयाची स्थापना झाली. ती कामगिरी संस्थानचे अधिपती मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांची. तेव्हा तिला ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे म्हटले गेले. स्थापना दिन आहे 9 ऑगस्ट 1870. म्हणजे लायब्ररीला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. तालुका पातळीवरील वाचनालय हे त्या काळी अप्रूप होते. मुधोजीराजांनी दोन हजारांपेक्षा अधिक ग्रंथ वाचनालयात संग्रहित केले. ते जुने ग्रंथ हे त्या वाचनालयाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ते ग्रंथ जतन करण्यात आले आहेत...

ठाणे कट्ट्याचे इवलेसे रोप… (Thane Park Discussion Group grows bigger along with the time)

संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ठाण्यात ‘आचार्य अत्रे कट्टा’ सुरू केला. त्यांनाही त्यांच्यातील अनभिज्ञ असलेल्या विचारांची, क्षमतेची ओळख त्या कट्ट्याने करून दिली. त्या कट्ट्याने त्यांना नवे विचार दिले, माणसे दिली, मैत्र दिले, अनुभव दिले आणि प्रसिद्धीही दिली. अशा त्या सुसंस्कृत कट्ट्याची ओळख लेखाद्वारे करून घेणार आहोत...

वृद्धांसाठी पुण्यात आभाळमाया (Abhalmaya For Elders in Pune)

वृद्धांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, वृद्धाश्रम आहेत. वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. डॉक्टर होऊन भौतिक माया वाढवण्यापेक्षा मायेने निराधार वृद्ध लोकांचा सांभाळ करावासा वाटणाऱ्या माणसांची विचारांची घडण अनन्यसाधारण असते. डॉ.अपर्णा देशमुख यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ‘आभाळमाया’ नावाचा वृद्धाश्रम सुरू केला...

मंडलीक ट्रस्ट – पंचायत राज प्रबोधनाचे कार्य (Mandalik Trust For Decentralised Democracy)

डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टची स्थापना 31 मार्च 1971 रोजी झाली. ट्रस्टचा सुवर्ण महोत्सवदेखील होऊन गेला. मात्र कोरोनामुळे त्या दोन वर्षांत ट्रस्टच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामास अनेक मर्यादा आल्या. परंतु ट्रस्टने गेल्या पाच दशकांत समाजजागृतीचे विशेषत: पंचायत राज संकल्पना जनमानसात मुरवण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. पी.व्ही. मंडलीक यांनी स्वत:च तो ट्रस्ट सामाजिक ऋणाच्या जाणिवेतून निर्माण केला...

सर्जनशील शेगाव – कवितेचे घर आणि स्व-विकास ग्रूप असलेले (Innovative Shegaon’s House of Poetry...

व्यक्त होणे हे मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण असते. छोट्या मुलांना आणि स्त्री-पुरुषांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ निर्माण करून देणारे श्रीकांत पेटकर आणि त्यांचे बंधू किशोर यांनी त्यांच्या शेगाव बुद्रुक या गावी ‘कवितेचे घर’ची स्थापना केली आहे. त्याबरोबर आपण जेथे राहतो, तेथे अर्धवट अशी सार्वजनिक सरकारी कामे पडलेली असतात...रस्ते नाहीत, खड्डे-गटार नाही, पाणी नाही अशा अनंत सरकारी गैरसोयी ! त्यावर कोणी तरी येऊन ते काम करेल अशी वाट न पाहता, त्यांनी निर्माण केलेला अनुकरणीय असा ‘व्हॉट्सॲप’वरील ‘विकास ग्रूप’...

बदनापूर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचे ध्येय…! (Devesh Pathrikar aims to have Badnapur cataract free)

0
देवेश पाथ्रीकर हे आहेत बदनापूर येथे मानसशास्त्राचे प्राध्यापक, पण त्यांनी वसा घेतला आहे तालुका मोतिबिंदू मुक्त करण्याचा. ते तालुक्यातील गावोगावी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून राहिले आहेत. डोळ्यांचा रोगी सापडला, की ते त्याला जरुरीप्रमाणे ‘औषधी-ड्रॉप्स’चे विनामूल्य वाटप करतात अथवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलात नेतात. त्यांचा प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम लागलेला असतो. त्यात मोतिबिंदूचे निदान असलेल्या रूग्णांवर थेट मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना घरपोच सोडले जाते...