carasole

धनत्रयोदशी

आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. त्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावतात. सायंकाळी घराबाहेर दिवा लावून, दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस ठेवल्यास अपमृत्यू टळतो अशी भावना आहे...
carasole

दीपावली – सण प्रकाशाचा!

दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या...
carasole

वसुबारस (Vasubaras)

वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते...
carasole

भुलाबाईचा उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृती

विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी असतो. भुलाबाईचा सण विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर...
carasole

कोकणातील गाबित शिमगोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...
carasole

गुढीपाडवा – हिंदू नववर्षाचा आरंभ

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या...
carasole

गुढीपाडवा – परंपरा आणि आधुनिकता

गुढीपाडवा आणि शोभायात्रा या दोन गोष्‍टींचे समीकरण गेल्या सतरा वर्षांत अधिकाधिक बळकट होत गेलेले दिसते. पूर्वी ठाणे-डोबिवली परिसरातून काढल्‍या जाणा-या शोभायात्रा राज्‍याच्‍या अनेक भागांमध्‍ये...
carasole

गोव्यातील नाताळ : ख्रिस्तजन्माचा उत्सव

मला सगळ्या भारतीय सणांत नाताळचा सण आवडतो. मी गोव्यात नाताळच्या सणापासून नव्या वर्षापर्यंत छोटीशी सुट्टी घेतो. स्थलांतरित पक्षी थव्याथव्याने यावेत तसे परदेशस्थ सगेसोयरे आणि...
carasole

आखाजी – शेतक-याचा सण

शेतक-यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा सण आहे, तो म्हणजे आखाजी. भारतीय परंपरेमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा समजला जातो, तरी खेड्यांमध्ये तो प्रामुख्याने व्यापा-यांचा आहे....

लंडनचा गणेशोत्सव

“मला गणपती बसवण्याची अनुमती द्या. पुढचे सोपस्कार माझ्यावर सोपवा.” सुधाकर खुर्जेकर यांचे हे उद्गार. लंडनच्या ‘महाराष्ट्र मंडळा’ची जानेवारी १९८९ मध्ये स्वत:ची वास्तू झाल्यानंतर गणेशोत्सव सुरू...