अरुण साधू यांना ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा ‘जनस्थान’ पुरस्कार तुमच्या हस्ते नाशिकला बहाल करण्यात आला, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष, जवळून बघितले! निखिल वागळे यांच्या ‘आजचा सवाल’ कार्यक्रमात, आठ-दहा वर्षांपूर्वी तुम्हाला टीव्ही पडद्यावर प्रथम पाहिले तेव्हा तुम्ही चुणचुणीत तरुण दिसला होतात. तुमची वाणी स्वच्छ होती, तुमच्यात संभाषणाचे व वक्तृत्वाचे कौशल्य जाणवले होते, तुमचे वाक्चातुर्य वाखाणण्यासारखे वाटले होते, व्यक्तिमत्त्वात कणखरपणा भासला होता; पण मृदुता कमी वाटली नव्हती आणि भाजपने हा कोण संप्रति विदर्भातील नवा अवतार पुढे आणला, बरे...