जामनेर – बागायती आणि सुसंस्कृत (Jamner – city with rich development and cultural activities)
जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे...
विराट विरार
विरार या एकेकाळी लहानशा असलेल्या गावाचे विराट नगरीत रूपांतर झाले आहे. हा लेख साधारणत: पाऊणशे वर्षांपूर्वीच्या विरारच्या गतस्मृतींमध्ये वाचकाला रमवतो. त्यावेळचे गावपण, परस्परांविषयीचा आपलेपणा व माणुसकीचा गहिवर, संस्कृतीच्या पाऊलखुणा झरझर डोळ्यांसमोरून तरळून जातात. भेदभावरहित अशी ती गावे शिक्षणाच्या विस्फोटाने, शहराच्या बंदिस्त जीवनशैलीने, आधुनिक सुविधा आणि श्रीमंतीने हरवून गेली आहेत...
चौगाव आमचा पारच बदलला! (Changing Face of Chaugaon Village)
माझे गाव चौगाव. चौगाव-गोताणे म्हटले, की लक्षात येते ते धुळे जिल्ह्याच्या, धुळे तालुक्यातील चौगाव. नाही तर सटाणा गावाजवळ एक चौगाव-रातीर आहे, चोपडा तालुक्यात एक चौगाव-लासूर आहे. माझे गाव मालेगावपासून साधारण चाळीस किलोमीटर उत्तरेला आणि नासिक जिल्ह्याच्या सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. ते ईराज नदीच्या काठावर डोंगरउतारावर वसले आहे.
गावगाथा (Gavgatha)
आवाहन माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी त्याचा गाव त्याच्या मनातून दूर जात नाही. आठवणी, अनुभव, संस्कार, तेथे झालेली शरीर आणि मन यांची घडण यांच्या मिश्रणातून गावाबद्दलची जी ओढ तयार होते ती विलक्षण असते. म्हणूनच माणसाने त्याच्या गावाचे नाव कोठेही निव्वळ वाचले-पाहिले तरी त्याला आनंद होतो...
गाईगोधन परंपरेचे हनवतखेडा
हनवतखेडा हे अचलपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलीकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गार्इंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते...
कोंडगाव-साखरपा हीच तर जुनी पेठ इभ्रामपूर! (Historical Reference of Kondgoan- Sakharpa)
साखरपा आणि कोंडगाव ह्या दोन्ही गावांचा उल्लेख साधारणत: एकत्रच केला जातो. ती दोन्ही गावे एकमेकांना लागून, जुळ्या भावांसारखी आहेत. ती गावे गड व काजळी या दोन नद्यांच्या संगमावरवसलेली आहेत.
जाल तुम्ही जालगावी सुज्ञ बनोनी!
दापोली-जालगावची हनुमान जयंती भैरी देवाच्या जत्रेने मोठी होते. त्या ठिकाणी जालगाव, गव्हे आणि गिम्हवणे अशा तीन गावांचे मनोमिलन होते ! दोनशे वर्षांची ही केवढी थोर परंपरा आहे. एरवीही दापोलीचे उपनगर असे जालगाव गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. बारा वाड्या आणि तीस नगरे असा त्याचा पसारा झाला आहे...
लिंगा गावचे अवधुत पंथी स्तंभ !
लिंगा गाव यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आहे. लिंगा-बोरगाव हे जोडगाव आहे, दोन्ही गावांची ग्रामपंचायत एक आहे – बोरगावचे सहा आणि लिंगाचे चार सभासद निवडले जातात. अधिकतर बोरगावचा सरपंच असतो. परंतु ती पोटगावे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. लिंगा वेगळे आणि बोरगाव वेगळे. लिंगाची लोकवस्ती साडेतीनशे. बोरगावची लोकवस्ती बाराशेच्या आसपास आहे...
वाटूळ ! (Watul Village)
विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची माहिती दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच...
नेहरोलीच्या होळीत लापसुटीची मजा (Nehroli Village in Palghar dist in Gavgatha)
नेहरोली हे गाव पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील दक्षिण सीमेवर वसलेले आहे. ते पालघर जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण साठ किलोमीटरवर येते. गाव आहे निसर्गरम्य, परंतु औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे गावाचा विकासही साधला गेला आहे.