4 POSTS
वामन देशपांडे हे संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ लेखक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची एकशे नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये रसिक वाचक म्हणून हजेरी लावली आहे. ते डोंबिवली येथे राहतात.