Home Authors Posts by प्राचार्य विश्वास पाटील

प्राचार्य विश्वास पाटील

3 POSTS 0 COMMENTS
विश्वास पाटील हे हिंदी भाषेचे निवृत्त प्राध्यापक. शिक्षण- एम ए पीएच डी (पुणे विद्यापीठ). जन्म 11 मार्च 1952 रोजी नंदुरबार येथे झाला. त्यांचे इतिहास व संस्कृती हे आवडीचे विषय आहेत. त्यांनी गांधी जीवन व चरित्र या विषयात हिंदी व मराठी भाषांमध्ये विविध तऱ्हेचे लेखन केले आहे. त्यांनी नारायणभाई महादेवभाई देसाई यांच्याबरोबर निरनिराळ्या कारणाने बराच काळ व्यतीत केला आहे. त्यांनी नंदुरबारचे हुतात्मा वीर शिरीषकुमार यांच्यावरील चित्रपटाची कथाही लिहिलेली आहे. त्यांनी मराठीत ललित लेखन व एकांकिका लिहिल्या आहेत. ते त्यांच्याशी संबंधित विषयांवर आकाशवाणी व दूरदर्शन या व्यासपीठांवर बोलत असतात.

विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !

महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...

बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज

बाळकोबा हे विनोबा भावे यांचे धाकटे बंधू. त्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले होते. ते गांधीजींच्या उरळी कांचन या निसर्गोपचार आश्रमाचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकीक मोठा आहे. त्यांनी ब्रह्मसूत्र व पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांनी त्यांतील अनावश्यक भाग वगळला व ग्रंथाचा नवा आशय प्रतिपादित केला. त्यांनी गीतेवरही विस्तृत भाष्य लिहिले आहे. बाळकोबांनी गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. त्यांनी ‘अभंग व्रते’ या शीर्षकाने विस्तृत ग्रंथ लिहिला. गांधीजींची एकादश व्रते आणि विनोबांनी त्यावर लिहिलेले पद्यबद्ध निरुपण हा त्या ग्रंथाचा विषय आहे...

माझे जीवन गाणे (My Life Story- Principal Vishwas Patil)

माझा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. माझे वडील इयत्ता चौथीपर्यंत शिकलेले. आईने तर शाळेचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता. तरीही माझे बालपण एका भावसमृद्ध वातावरणात गेले. मला माझे बालपणीचे चित्र आठवते... लहानगा मी बाबांचे बोट मुठीत धरून चालत आहे. रस्त्याने त्यांना अक्षरश: दुतर्फा लोक अभिवादन करत आहेत. ते कधी माझी मूठ उंचावल्यासारखे करत, तर कधी डावा हात उंचावून, कधी भुवया उंचावून तर कधी स्मिताने अभिवादन स्वीकारत आहेत. कधी थांबून चौकशी करत आहेत. कधी काळजी व्यक्त करत आहेत. कधी मदतीचा हात पुढे करत आहेत ...