9 POSTS
उमेश घेवरीकर हे शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण बी एस्सी, बी एड असे आहे. ते लेखक, अभिनेते, दिग्दर्शक, सूत्रसंचालक आणि लघुपट निर्माते आहेत. त्यांनी ‘बाबू बँड बाजा’ आणि ‘पुरुषोत्तम’ या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. घेवरीकर यांच्या ‘द विनर’, ‘वन लाईन स्टोरी’, ‘व्होट फॉर इंडिया’ या लघुपटांना राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. उमेश घेवरीकर यांची ‘विजेता’ (बालकुमार कथा), ‘हृदयस्थ’ आणि ‘शिक्षणाच्या कविता’ (कवितासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित आहेत.