4 POSTS
सुनंदा भोसेकर यांना भाषा विकास आणि संस्कृती यांच्या अभ्यासात आणि प्रवासात विशेष रस आहे. त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये वाचन आणि संस्कृतीविषयक सदर लेखन केले आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले असून तिसरा प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
या जगात सगळ्यात जास्त भटके-विमुक्त कोण असतील, तर ते म्हणजे भाषेतील शब्द. मानव समाज स्थिर झाल्यानंतर नवनव्या अवजारांचे, नवनव्या तंत्रांचे शोध लागत गेले. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागले. माणसाला शिकारी अवस्थेतील खडतर जीवनापासून थोडी मुक्ती मिळाली, कला-कौशल्ये विकसित झाली आणि साहजिकच व्यापाराला चालना मिळाली. भाषांची, शब्दांची देवाणघेवाण व्यापारामुळे जेवढी झाली तेवढी इतर कोठल्याही घटकामुळे झाली नसेल. व्यापारमार्गावर झालेल्या भाषिक देवाणघेवाणीमुळे भारतीय भाषांमध्ये फारसी, अरबी, तुर्की, मंगोल, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पॅनिश भाषांमधील शब्द आढळतात. इंग्रजी शब्दांबद्दल तर बोलायलाच नको...