श्रीकांत पेटकर
सह्याजीराव सतीश चाफेकर (Satish Chaphekar – Man with Thousands of Autographs)
स्वाक्षऱ्यांसाठी डोंबिवलीला एक घर आहे ! घराचे नाव आहे ‘हे माझे घर, शब्दाचे’; अन् या अवलिया घरमालकाचे नाव आहे सतीश चाफेकर. ते घर म्हणजे आहे एका छोट्या फ्लॅटची टुमदार खोली, पण तिच्या भिंती भरल्या आहेत सह्यांनी मान्यवरांच्या, ‘स्टार्स’च्या, खेळाडूंच्या. अगदी सचिनची आई रजनी तेंडुलकर आणि कवी ग्रेस यांनी त्या खोलीत येऊन त्यांची त्यांची सही केली आहे. त्या खेरीज, चाफेकर यांनी पस्तीस-छत्तीस डायऱ्या, क्रिकेटच्या कितीतरी बॅटा, टी शर्ट, छत्र्या, मास्क अशा संबंधित अनेकविध साहित्यावर सह्या घेतलेल्या आहेत आणि त्या तेथे जपून-राखून ठेवल्या आहेत. त्यांचे मोल कोट्यवधी रुपयांचे, खरे तर अनमोल आहे. सतीश चाफेकर यांचे नाव ‘लिम्का बुक’च्या विक्रमवीरांच्या यादीत सहा वेळा नोंदले गेले आहे...
सर्जनशील शेगाव – कवितेचे घर आणि स्व-विकास ग्रूप असलेले (Innovative Shegaon’s House of Poetry...
व्यक्त होणे हे मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण असते. छोट्या मुलांना आणि स्त्री-पुरुषांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ निर्माण करून देणारे श्रीकांत पेटकर आणि त्यांचे बंधू किशोर यांनी त्यांच्या शेगाव बुद्रुक या गावी ‘कवितेचे घर’ची स्थापना केली आहे. त्याबरोबर आपण जेथे राहतो, तेथे अर्धवट अशी सार्वजनिक सरकारी कामे पडलेली असतात...रस्ते नाहीत, खड्डे-गटार नाही, पाणी नाही अशा अनंत सरकारी गैरसोयी ! त्यावर कोणी तरी येऊन ते काम करेल अशी वाट न पाहता, त्यांनी निर्माण केलेला अनुकरणीय असा ‘व्हॉट्सॲप’वरील ‘विकास ग्रूप’...
खेळ मांडीयेला : भातुकलीचा इतिहास (Bhatukli – Enjoyable home management game for girls)
वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांच्या ‘खेळ मांडीयेला’ या पुस्तकातून भातुकली या खेळाचा, मराठी संस्कृतीचा व समृद्ध परंपरेचा इतिहास आणि वारसा प्रकट होतो ! भातुकलीच्या सर्व पैलूंचे दर्शन आणि दस्तावेजीकरण या पुस्तकात आढळते…
शांबरिक खरोलिका – पडद्यावरील हलती चित्रे (Shambarik Kharolika – Show That Preceded Film Medium)
कल्याणचे(ठाणे जिल्हा)) पटवर्धन बंधू यांच्या ‘शांबरिक खरोलिका’ नावाच्या खेळाने पडद्यावरील हलत्या चित्रांच्या माध्यमातून कथाकथनास सुरुवात झाली. ती चित्रपट माध्यमाची आरंभीची झलक असे म्हणता येईल. त्यानंतर दादासाहेब तोरणे व नंतर दादासाहेब फाळके ...
विन्सुरा – विंचूरची वाइन (सुरा) (Vinsura Wine)
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ची 'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' मोहीम सुरू होती. 'थिंक'चे कार्यकर्ते निफाड तालुक्यातील गावागावांत भटकंती करत होते. ती भटकंती विंचूर गावापर्यंत पोचली आणि...
सच्चे मानवतावादी मानवटकर डॉक्टर दांपत्य
चंद्रपुरातील माधुरी मानवटकर आणि प्रकाश मानवटकर हे डॉक्टर दांपत्य ध्येयवेडे आहे. डॉ. माधुरी स्तनाच्या कर्करोगावर जागरूकता निर्माण व्हावी म्हणून त्याच विषयावर नियमितपणे व्याख्याने, सेमिनार...
ए.के. शेख; गझलमध्ये जगणारे!
ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांची ‘गझल’ या विषयावर कार्यशाळा अलिबागला ‘साहित्यसंपदा ग्रूप’तर्फे योजली होती. मी अलिबागला जाण्यासाठी कल्याणहून पनवेलला बसने पोचलो. पनवेलच्या बसस्टॉपवर शेखसर...
झोपडपट्टी ते इस्रो – प्रथमेश हिरवेची गगनभरारी
पवई फिल्टरपाडा झोपडवस्तीत (नीटी चाळ) राहणारा प्रथमेश 22 जानेवारीला इस्रो विभागीय प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून हजर झाला आहे. त्याचे वडील सोमा हिरवे हे मरोळ येथे...
चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी (Ramdegi)
रामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य पण फार परिचित नसलेले ठिकाण. रामदेगी वरोरा तालुक्यात आहे. आनंदवनापासून शेगाव बुद्रुक हे आठवडी बाजाराचे गाव ओलांडले, की पुढे...
चंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे
मनोहर सप्रे त्या वेळेस तीस-बत्तीस वर्षांचे असतील, ते एके दिवशी मुलांसोबत जंगलात फिरत असताना, मुलांनी रस्त्यालगतचा एक लाकडी ओंडका उचलला. सप्रे यांना त्या लाकडात आकार दिसला! त्यांनी ते लाकूड घरी आणले. त्यांनी त्या लाकडाला कल्पकतेने थोडा आकार देऊन, त्यातून एक शिल्प साकारले - ‘आईचे व मुलाचे’! सप्रे यांना ते ‘जिवंत झालेले’ शिल्प खूप आवडले. झाले! सप्रे यांना मार्ग सापडला. ते त्यांचे पहिलेवहिले शिल्प...