श्रीधर गांगल यांना वाचनाची आवड आहे. 'ग्रंथाली' संपर्कात आल्याने, त्यात विविधता आली. त्यांना अभ्यासू, विद्वानांचे विचार ऐकायला, वाचायला मिळाल्याने, वाचलेल्या लेख-पुस्तकांवर चिकीत्सक वृत्तीने बघण्याचा दृष्टीकोन लाभला.
एक वाचलेला वेगळा किस्सा आठवतो. नाटककार वसंत कानेटकर व त्यांच्या पत्नी (उषा) सिंधुताई, दोघे एका साहित्यिक कार्यक्रमासाठी हैदराबादला 1971-72 साली गेली होती...
'लोकसत्ता' दैनिकाने सीडी ऊर्फ चिंतामणराव देशमुख ह्यांच्या कार्याचा वेध घेणारा एक विशेषांक त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, प्रसिद्ध केला आहे (30 मे 2021). तो वाचताना मला त्यात काही उणिवा जाणवल्या. वाटले, इतक्या महान व्यक्तीचे कार्य ग्रंथित करताना, तो अंक सत्याधारित, सर्वसमावेशक आणि सखोल संशोधनपूर्वक व्हायला हवा होता. महाराष्ट्रात सीडींबद्दल आदर व प्रेम आहे. ते अर्थशास्त्रावर अधिकारवाणीने लिहू/बोलू शकणारे मान्यवर आहेत. तेव्हा सीडींना अर्थशास्त्रात जे प्राविण्य प्राप्त झाले ते त्यांनी कोठे व केव्हा मिळवले?...
आम्ही घर बदलले त्यास तेरा वर्षें उलटून गेली. जुन्या घराच्या रस्त्यावरून जाणेयेणे होते, पण मुद्दामहून त्या घराकडे पाय वळत नाहीत. सुरुवातीच्या एक-दोन वर्षांत जुन्या...
- श्रीधर गांगल
शिक्षकीपेशा हा त्यांच्या रोजीरोटीचा मार्ग, पण ठाण्यातील काही शिक्षक नि शिक्षणप्रेमी महिन्यातून एक दिवस एकत्र जमतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करण्यासाठी. त्या उपक्रमाचे...