Home Authors Posts by ऋजुता तायडे

ऋजुता तायडे

2 POSTS 0 COMMENTS
ऋजुता तायडे या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. त्या दिग्रस येथे राहतात. त्यांचा वागीश्वरी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांना शिक्षक रत्न, पाककृती-लेखनकार्य असे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना कलात्मक वस्तू बनवण्याची आवड आहे.

घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी

3
दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे...

दिग्रसचे दत्तगुरू मंदिर

0
दिग्रस तालुक्यातील प्रसिद्ध दत्तमंदिर दत्तोबा या नावाने ओळखले जाते. ते रामकृष्ण तायडे यांच्या शेतात आहे. ते दिग्रस शहरापासून साडेबारा किलोमीटर अंतरावर बेलोरा गाव परिसरात येते. त्या शेतात दत्तमंदिर असल्यामुळे शेताचे नावही दत्तोबा असे पडले आहे. तो विदर्भाचा यवतमाळ जिल्हा. दत्तोबा हे स्थान माहूरगड आणि कारंजा लाड या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गावांपासून प्रत्येकी पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे...