रोहिणी लोखंडे या पदवीधर शिक्षिका आणि बालरक्षक आहेत. त्या पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर येथे शिक्षिका आहेत. त्यांना सव्वीस वर्षे नोकरीचा अनुभव आहे.
शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...