Home Authors Posts by राम देशपांडे

राम देशपांडे

9 POSTS 0 COMMENTS
राम देशपांडे यांना चालता बोलता ज्ञानकोश असे म्हटले जाते. त्यांच्याकडे साहित्यिकांची, मान्यवर व्यक्तींची हस्ताक्षरे, हस्तलिखिते; तसेच, मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा, विविध विषयांवरील ग्रंथ- तसेच, त्यांवरील कात्रणे, जुनी मासिके-पुस्तके यांचा संग्रह आहे. संदर्भ हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यानी साहित्य, संगीत, कला, प्रसारमाध्यम, विज्ञान, आरोग्य, व्यक्ती या विषयांवरील कात्रणे गोळा केली आहेत. त्यांच्या संदर्भसाधनांचा उपयोग अनेक जिज्ञासू, अभ्यासक, प्राध्यापक, संस्था यांनाही होतो.

कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती आणि कवी बोरकर

कुसुमाग्रज यांच्या रसिकमान्य, वाचकप्रिय कवितांपैकी 'स्वप्नाची समाप्ती' ही एक कविता आहे. त्या कवितेच्या ओळी जाणत्या मंडळींच्या ओठांवर ऐकण्यास मिळतात. अनेकांनी या कवितेविषयी सांगितले तरी ती कविता वाचण्यास सुरूवात केली तरीदेखील या क्षणाला नवा आनंद देते. 'स्वप्नाची समाप्ती' या कवितेविषयीची एक छान आठवण कवी बा.भ. बोरकर यांनी 'कौतुक तू पाहे संचिताचे' या त्यांच्या आत्मकथेत रसाळपणाने कथन केली आहे...

वि.स. खांडेकर- एक विसावा (Remembering V.S. Khandekar)

मराठीला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे, मागच्या शतकातले विख्यात लेखक वि.स. खांडेकर यांची 11 जानेवारी 2024 रोजी एकशेपंचविसावी जयंती आहे. कथा, पटकथा, कादंबऱ्या, नाटके, ललितलेख, निबंध, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये खाडेकरांच्या नावावर पंचाहत्तरपेक्षा जास्त लेखनकृती आहेत. आजही त्यांच्या ‘अमृतवेल’, ‘उल्का’, ‘ययाती’, ‘क्रौंचवध’ या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत. त्यांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे लेखनिक राहिलेले राम देशपांडे त्यांच्या आठवणी सांगत आहेत...

सखा कलाल – एका कथाकाराची अखेर

सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले...

… बेडेकर मोठे साहित्यिक का? (Why Bedekar is a great writer?)

‘रणांगण’ या एकमेव कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर कोल्हापूरला आले होते. त्यांना विचारलेला एक प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर...

वि.स. खांडेकर यांचे तरुणांना आवाहन (V.S. Khandekar’s Appeal to the Youth)

वि.स. खांडेकर (भाऊसाहेब) यांनी मराठी भाषेला पहिले ज्ञानपीठ मिळवून दिले. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 चा आणि त्यांचे निधन झाले 2 सप्टेंबर 1976 रोजी. भाऊसाहेबांनी विविध प्रकारचे लेखन केले...

माझी लेखन उमेदवारी – नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar’s Effort of His First Writing)

माझे प्रकाशनासाठी पाठवलेले पहिले साहित्य म्हणजे एक कविता होती. मी वयाच्या दहाव्या वर्षी मराठी पाचव्या इयत्तेत शिकत होतो. त्या वयात प्रेमकविता लिहिण्याचे काहीच कारण नव्हते, पण लिहिली. मला तिच्यातील कल्पना आठवते. त्या कवितेत प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्याप्रमाणे आहेत अशी नोंद होती.

स्मरण, यशवंतांच्या महाराष्ट्र गीताचे (Lyric Yashwanta’s Dedicated Poetry to the State of Maharashtra)

कोरोनाच्या या प्रदीर्घ काळात वातावरण चिंताग्रस्त आहे. आजारपणाच्या बातम्या सतत येत असतात आणि मनात भेटण्याची ओढ वाटत असूनही कोरोनाच्या विचित्र परिस्थितीमुळे कोणी कोणाला भेटण्यास जात नाही.

कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)

"ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा." लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला...

केशवसुत यांचे मालगुंड – मराठी कवितेची राजधानी! (Keshavsut, The Marathi Poet Remembered)

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री राम शेवाळकर, समस्त मराठी लेखक, ज्यांच्या संबंधात सर्वजण नेहमी धास्तावलेले असतात ते माजी ‘सत्यकथे’चे संपादक श्री.पु. भागवत, मधुमंगेश आणि मित्र हो!