रजनी देवधर या मुंबई महानगरपालिकेतील नोकरीतून निवृत्त झाल्या आहेत. त्या ठाणे येथे राहतात. त्यांना इंग्रजी-मराठी साहित्याची आवड आहे. त्यांची देश-विदेशांत भटकंती असते.
कोकण किनाऱ्यावरील केळशीला पाचशे वर्षांपूर्वी, 1524 साली त्सुनामीने तडाखा दिला होता. त्यात सारे गाव उद्ध्वस्त झालेच, परंतु त्यातून केळशीच्या सागर किनाऱ्यावर वाळूचा बंधारा उभा ठाकला तो आजतागायत. वादळातील समुद्र लाटांचे तांडव शांत झाले. गावात आलेले समुद्राचे पाणी खाडीत वाहत जाऊन परत समुद्राला मिळाले. वाळूचा तो ढिगारा मात्र जमिनीवर राहिला – एक हजार मीटर लांब, अठरा मीटर उंच ! मात्र कालपरत्वे वारा, पावसामुळे त्याची झीज होऊन तो अठरा मीटर उंचीचा आठ मीटर झाला आहे. त्या आपत्तीची नोंद अधिकृत शाही वा नंतरच्या ब्रिटिश दफ्तरांत आढळत नाही. मात्र वास्को द गामा या खलाशाच्या नोंदीत त्या वादळाचे वर्णन व संदर्भ मिळाले आहेत...
भूकंपीय समुद्राच्या लाटांना त्सुनामी म्हटले जाते. त्सुनामी हा शब्द जपानी आहे. त्याचा अर्थ ‘बंदर लाट’ असा होतो. जपानी भाषेत ‘त्सु’ म्हणजे बंदर आणि ‘नामी’ म्हणजे लाट. तो शब्द तेथील कोळ्यांत प्रचलित होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा मात्र दिसत नसत; त्यामुळे ‘त्सुनामी’ असे नाव त्यांच्याकडून त्या घटनेस उच्चारले जावू लागले व तेच प्रचलित झाले. समुद्रावर त्सुनामी लाटा प्राचीन काळापासून जगभरात आल्या आहेत. त्या लाटांनी काही बेटांवरील मानवाचे अस्तित्व पुसून टाकले आहे...
कोंडाणे लेणी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात त्याच नावाच्या गावात आहेत. बोरघाटातील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट अरण्य आहे. मोठे वृक्ष, महाकाय वेली आणि जंगली श्वापदे यांचा वावर तेथे असतो. त्यात वृक्षवेलींच्या-झाडझाडोऱ्यांच्या गुंत्यात लपल्या होत्या कोंडाणे लेण्यांच्या अप्रतिम शिल्पकृती. लेणी इसवी सनापूर्वी पहिल्या-दुसऱ्या शतकांत साकारण्यात आली. परंतु ती लेणी किर्र रान, मुसळधार पाऊस आणि भूकंप यांनी झालेली पडझड यांमुळे ओसाड होऊन गेली आणि विस्मृतीच्या पडद्याआड सारली गेली...
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आलेला चंद्र आकाशात वर येऊ लागतो आणि पूर्वाभिमुख असलेल्या कोपेश्वर मंदिरावर त्याची किरणे पडू लागतात. मंदिर शुभ्रधवल चंद्रप्रकाशाने उजळू लागते. शरद ऋतूमधील आल्हाददायक चैतन्यमय वातावरण आणि त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे उल्हसित करणारे भासते. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री तारकाकृती मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून चंद्रकिरण मंदिरात आत प्रवेश करतात. झरोक्याखाली असलेली रंगशिळा चंद्रप्रकाशात उजळून जाते. वर्षातून एकदा, फक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री काही घटिकांपुरता होणारा हा सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलवतो. हे प्राचीन शिव-विष्णू मंदिर शिल्पकृतींनी संपन्न आहे...
सूर्यमूर्ती या भारतात इसवी सनापूर्वी दोन शतकांत घडवण्यात येऊ लागली. सूर्याचे देव म्हणून महत्त्व इसवी सनाच्या चौथ्या, पाचव्या शतकात, म्हणजे गुप्त काळात वाढत गेले आणि उपासना मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी या गावी ‘कनकादित्य’ नावाने सूर्य मंदिर प्रसिद्ध आहे. ते मंदिर सुमारे एक हजार वर्षे पुरातन आहे. कशेळी गावाजवळ असलेले आडिवरे गाव मुचकुंदी नदीच्या खाडीच्या मुखाशी वसलेले आहे. आडिवरे या नावाची उपपत्ती आदितवाड म्हणजे जेथे सूर्योपासना होती ते गाव अशी असल्याचे पुरातत्त्व खात्याच्या संशोधन पत्रिकेत म्हटले आहे...
दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते. मुरुडच्या दुर्गादेवीच्या देवळाची कथा तशीच आहे. मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्धपुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले. तशी बखर आहे. गंगाधर भट समुद्रकाठाकाठाने सोळाव्या शतकात सौराष्ट्रातून आले होते. मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली. मंदिरे स्थापन झाली. तरी एक भय राहिले. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे सावट असे. गावे लुटली जात. म्हणून रक्षणकर्त्या दैवताचे सान्निध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले...
दापोलीचे ‘बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ’, ही देशातील कृषी संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या विद्यापीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान, कोकणातली पिके, फळे,...
नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील साल्हेर आणि मुल्हेर हे दोन आवळे जावळे किल्ले, महाराष्ट्र आनि गुजरातच्या सीमेवर वसलेले आहेत. पैकी साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त...
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लांबलचक नावाच्या रेल्वेस्टेशनवर पहिल्यांदा उतरणारा माणूस अनेक गोष्टींना बिचकतो, चकित होतो. मग ती त्या स्टेशनची भव्य इमारत, तिथली गर्दी असो की स्टेशनबाहेर पडल्यावर दिसणारी मुंबई महापालिकेची इमारत ! स्टेशनच्या दोन्ही दिशांना अनेक वारसा इमारती म्हणजे हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत, ज्या आवर्जून बघायला हव्यात. त्यातील अनेक इमारतींमध्ये सर्वसामान्य मुंबईकर काम करत असतात पण ते रोजच्या जगण्याच्या लढाईत इतके गुंतलेले असतात की स्वतःच्या कार्यालयाची इमारतही ते साक्षेपाने बघत नाहीत. ‘मुंबई नगरीतली महापालिका’ या लेखात मुंबई महापालिकेच्या भव्य ऐतिहासिक इमारतीचा इतिहास आणि वर्तमान स्थिती याविषयी माहिती दिली आहे...
धोंडो केशव कर्वे व त्यांचे चिरंजीव रघुनाथ धोंडो कर्वे या दोन समाजसुधारक नररत्नांनी त्यांच्या लोकोत्तर कार्याने दापोलीतील मुरूड गावाची ओळख साऱ्या जगाला करून दिली; जनरीत बदलली ! पिता व पुत्र पुरोगामी, प्रगत विचारसरणीचे, अनिष्ट रूढींविरूद्ध झगडणारे समाजसुधारक होते. दोघांमध्ये धारदार बुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन व समाजाच्या सुखासाठी झटण्याची निस्पृह सेवावृत्ती होती. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्या आयुष्याचे योगदान स्त्रियांचे शिक्षण, विधवा विवाह या कार्यासाठी दिले...