Home Authors Posts by नितेश शिंदे

नितेश शिंदे

84 POSTS 0 COMMENTS
नितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरींग आणि एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग असतो. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर 'स्ट्रीट प्ले' आणि 'लघुनाटके' लिहिली आहेत. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांना 'के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुंडट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे.

आबासाहेब काकडे – झुंजार लोकनेते

आबासाहेब काकडे हे नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मोठे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जीवनात गेल्या शतकातील सर्व प्रभाव यथार्थ जाणवून जातात हे विशेष होय. त्यांच्या घराण्याचा इतिहास शिवकाळापर्यंत मागे जातो. त्या मंडळींना परिस्थितीवश बीड जिल्ह्यातून स्थलांतर करावे लागले. ब्रिटिश काळातील घराण्याचा आब, त्याबरोबर देश स्वातंत्र्याची आस, शिक्षणाची ओढ आणि घरातून व आधुनिक शिक्षणातून लाभलेले संस्कार - त्यातून उभी राहिलेली आंदोलने व घडलेले शिक्षण प्रसारासारखे विधायक काम... आबासाहेबांचे आयुष्य अनेकविध घटनांनी भरलेले आहे...

नाण्यांच्या माध्यमातून अर्थसाक्षरता – जयवंत जालगावकर (Jaywant Jalgaonkar – Bankman loves coins and liquor...

दापोलीचे जयवंत जालगावकर हे जवळजवळ गेली तीस वर्षे स्थानिक अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या व कधी कधी राज्य बँकेच्या जबाबदाऱ्याही असतात. तरीसुद्धा जयवंत हे केव्हाही दिलखुलास असतात. जयवंत यांना दोन महत्त्वाचे छंद आहेत. पहिला विविध वस्तू, विशेषतः नाणी जमवण्याचा. त्यांच्याकडे सत्तावीस देशांची चलनातील नाणी आहेत. जयवंत यांचा दुसरा छंद अनोखा आहे. ते दारूच्या भरलेल्या बाटल्या जमा करतात. विविध आकारांच्या, विविध शैलींच्या, विविध देशांच्या अशा पाचशेदहा बाटल्या त्यांच्या संग्रही आहेत...

सचिन भगत – शेतकऱ्याचे चित्त नाण्यांच्या नवीनतेत ! (A farmer with a heart for...

फलटणच्या शिंदेवाडीचे सचिन भगत कसतात शेती. पण त्यांची एक बारीक नजर असते ती त्यांच्या नाणेसंग्रहावर ! मगध-देवगिरी-यादव-मोगल अशी, विविध साम्राज्यांची आणि विविध काळांची नाणी त्यांच्या संग्रही आहेत. त्यातील एक विभाग अर्थातच शिवराई नाण्यांचा - त्याबद्दल बोलताना सचिन भावुक होतात आणि क्षणात त्यांचे बोलणे मराठेशाहीबद्दलच्या अभिमानाने भरले जाते...

फलटणचे श्रीराम मंदिर

फलटणचे श्रीराम मंदिर जब्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला आहे. ते मंदिर सगुणाबाई निंबाळकर यांनी शके 1696 मध्ये बांधले. मुख्य मंदिरापुढील लाकडी मंडपाचे बांधकाम मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांनी शके 1797 मध्ये केले. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ व सभामंडप अशी आहे...

फलटणचे जब्रेश्वर मंदिर

फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो. फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे...

फलटणचा संस्कृतिशोध !

0
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...

वऱ्हाडची राजधानी अचलपूर

अचलपूर ही वऱ्हाडची जुनी राजधानी. त्या परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एलिचपूर हे त्याचे जुने नाव. त्या गावाला लष्करी डावपेचाच्या दृष्टीने इतिहासात फार महत्त्व होते. भारताच्या उत्तरेतून दक्षिण प्रदेशात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वारच ते ! बराणीने अचलपूरचा भारताच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे शहर म्हणून तेराव्या शतकात उल्लेख केलेला आहे...

बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राची वाटचाल

बदनापूर संशोधन केंद्र हे अखिल भारतीय कडधान्य सुधार प्रकल्पातील एक प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र जालना जिल्ह्यात येते. त्याचा कारभार मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालतो. तेथे महाराष्ट्रातील महत्त्वाची कडधान्ये, विशेषत: तूर, मूग, उडीद आणि हरभरा या पिकांवर संशोधन केले जाते...

बदनापूर तालुका: महाराष्ट्राचा मध्य

बदनापूर हा जालना जिल्ह्यातील एक तालुका. बदनापूर हे जालन्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. जालना जिल्हा मोसंबी फळासाठी राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात कडधान्याच्या वेगवेगळ्या जातींची बियाणी यांबाबत संशोधन चालते. त्या संशोधन केंद्राचे नाव कृषी क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते...

कोळथरे गावचा कासव जलार्पण सोहळा !

कोळथरे हे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले दापोली तालुक्यातील गाव ! तेथील समुद्र हा पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहे. ते गाव दाभोळमधील बुरोंडीच्या पुढे मुख्य रस्त्यापासून खाली, समुद्रकिनारी वसलेले आहे. तेथील पंचनदी ही छोटीशी नदी जेथे समुद्राला मिळते तेथील परिसर निसर्गरम्य आहे. भारताच्या क्रिकेट संघातील एके काळचा जलदगती गोलंदाज अजित आगरकर यांचे कोळथरे हे गाव...