मंजूषा देशपांडे
दिवाळीच्या फराळाची खुमारी
दिवाळीतील आनंदाचा एक भाग म्हणजे एकाच वेळी खाण्यासाठी उपलब्ध होत असलेले आठ-नऊ प्रकारचे खमंग, तिखट व गोड पदार्थ बनवले किंवा विकत आणले जातात. त्या पदार्थ समूहाला दिवाळीचा ‘फराळ’ असे थाटाने आणि मानाने म्हटले जाते. मला फराळ प्रत्यक्ष खाण्यापेक्षा फराळाच्या पदार्थांनी ओसंडून वाहणारी दुकाने आणि दिवाळीपूर्वी घराघरांतून येणारे भाजणीचे आणि तळणीचे तिखटमधुर वास अधिक आवडतात. पहिला पदार्थ म्हणजे आमच्या घरच्या विदर्भातील चकल्या. आमच्या घरी दिवाळीसाठी म्हणून चिवडा, दोनतीन प्रकारचे लाडू, शंकरपाळी, करंज्या वगैरे अगोदर करून ठेवतात, पण चकल्या मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ताज्या करतात...
आली गवराई अंगणी…
गवर म्हणजे गौरीची झाडे आणि फुले. ही फुले फार तर तीन दिवस टिकतात श्रावणातील सगळ्या पूजा, मंगळागौर आणि भराडी गौर सजवताना ‘गौरीची’ फुले आवर्जून वापरली जातात. एकेरी, डबल, तिब्बल पण पातळ पाकळ्यांची अक्षरशः अनंत रंगांतील ही फुले, कोणत्याही पूजेच्या सजावटीत मोठी खुलून दिसतात. इथून तिथून कोणत्याही गौरीला तेरडा असेही म्हणतात. गौरीच्या झाडाचे आयुष्य फार तर महिनाभर आणि फुलांचे तीनच दिवस. तिच्या अल्पायू व्यक्तिमत्त्वामुळे ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ असल्या म्हणी जन्माला आल्या. हिंदी आणि उर्दूत तिला ‘गुलमेहंदी’ म्हणतात, कारण त्या फुलांपासून लाल केशरी रंग तयार करता येतात...
बकुळफुलांचा अक्षयगंध… अक्षयरंग… (Blossoming Bakul)
बकुळीचे झाड हे मूळचे भारतीय उपखंडातील झाड आहे. त्याच्या फुलांचा सुगंध मोहक आहे आणि रूप मनोवेधक आहे. हे झाड औषधी वनस्पतीही आहे. पूर्ण वाढलेले बकुळीचे झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या त्या झाडाखाली दाट सावली असते. बकुळीच्या फुलांचे वेड सर्वांना, विशेषत: मुलींना असते. त्या फुले गोळा करत बकुळीच्या झाडाखाली तासचे तास रमू शकतात. या बहुगुणी झाडाविषयी मंजूषा देशपांडे त्यांच्या आठवणी आणि अनुभव सांगत आहेत...
पाऊस पहावा (Enjoying Rains)
पावसाळा हा सृजनाचा, आनंदाचा ऋतू. प्रत्येक माणसाच्या मनात पावसाच्या काही खास आठवणी असतात. मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या पावसाळ्यातल्या भटकंतीच्या, धबधब्यांच्या, सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या, हिरवाईच्या आणि क्वचित निसर्गाच्या कोपाला एकत्र येऊन तोंड देण्याच्याही. जसजसा काळ जातो तसतशा या आठवणी अधिक गहिऱ्या होत जातात.
भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण भागात पावसाची अशी एक खास परिभाषा, पावसाविषयी ठोकताळे आहेत. ते जाणून घेण्यात मजा आहे. सध्या पावसाने संततधार धरली आहे. अशा या बाहेरच्या पावसाविषयीचा डॉ. मंजूषा देशपांडे यांचा ललित लेख ज्याच्यात्याच्या मनातल्या पावसाच्या आठवणी हमखास जाग्या करेल...
अंगण (Courtyard)
एखाद्या शब्दासरशी आपल्या मनात रूप, रंग, गंध, नाद; अशा अनेक संवेदना जाग्या होतात. ओल्या फुलाचे परागकण हाताला चिकटून यावेत तशा आठवणी जाग्या होतात. ‘मातीचा वास आला!’ या गद्य शब्दात किती सुगंध, उल्हास साठला आहे. सध्याच्या दिवसात किती असोशीने आपण त्या वासाची वाट पहात आहोत. अशाच संवेदना वेगवेगळ्या जागांशी, घरांशी संबधित असतात. आजच्या लेखात मंजूषा देशपांडे यांनी त्यांनी पाहिलेल्या आणि त्यांच्या मनातल्या अंगणांविषयी लिहिले आहे...
गंधगान (Whispers on the Wind !)
‘मोगरा फुलला’ हे सदर सुरू करून दोन महिने झाले आहेत. दालन सुरू करताना संवेदना उजागर करणे आणि जाणीवसमृद्धी असे दोन उद्देश समोर ठेवले होते. पंचेंद्रियांना जे जाणवते ते शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आजचा डॉ. मंजुषा देशपांडे यांचा ‘गंधगान’ हा लेख पंचेंद्रियांना जे जाणवते त्यापलिकडे जाऊन अबोध नेणिवेत रुतून बसलेल्या जाणिवांविषयी सांगत आहे. एक ज्ञानेंद्रिय विकल असेल तर इतर ज्ञानेंद्रिये अधिक सजग होतात आणि विकल ज्ञानेंद्रियामुळे आलेले न्यून दूर करण्याचा प्रयत्न करतात...
गल्लीतली दिवाळी सुट्टी (Diwali Vacation in Good Old Days!)
आमची गल्ली म्हणजे राजारामपुरी अकरावी गल्ली, कोल्हापूर. आमच्या लहानपणी आम्ही या गल्लीत राहत असू. सहामाही परीक्षा संपली की शाळेला दिवाळीची सुट्टी लागायची. त्यावेळच्या दिवाळी सुट्टीचे, दिवाळीच्या अगोदरची आणि दिवाळीच्या नंतरची सुट्टी असे सरळ सरळ दोन भाग करता येत. त्या काळातल्या आठवणींनी डोळे क्षणभर पाणावतात. केवळ क्षणभरच... आजच्या सुट्टीतली मजा विकत घेतलेली असली तरी... सोयीची आहे... कालसुसंगत आहे... हे जाणवत राहतं...
लाडूच लाडू -विचित्र नावांचे स्वादिष्ट लाडू (Laddus with Strange Names)
किती चित्रविचित्र नावांचे लाडू या जगात आहेत याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. उदाहरणार्थ, ‘खडखडे लाडू’. मालवण पट्टयात मिळणाऱ्या कडक बुंदीच्या लाडवांना खडखडे लाडू म्हणतात. तेथील लाडू जाड शेवेचे, काजूचे आणि खडखडे लाडू खडखड करत पोराबाळांनी खावेत किंवा दात पडलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांनी वेळ जावा म्हणून चघळत बसावेत किंवा डब्यात खडखड वाजत असावेत म्हणून खडखडे. बेळगावकर सारस्वत लोकांच्या दिवाळीत ‘लडगी लाडू’ असतात. ‘खूळे लाडू’ नावाचे लाडू बेळगाव ते संकेश्वर भागात गणपती विसर्जनाच्या वेळी बनवतात...
कोजागिरी पौर्णिमा अर्थात मोत्यांची पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा मी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी केली आहे की बस ! कधी शेतात, कधी गच्चीवर, कधी नदीकाठी; तर कधी कोणाच्या अंगणात. त्या प्रत्येक पौर्णिमेची आठवण माझ्यासाठी खास आहे. आमच्या घरी त्या दिवशी पहिल्या अपत्याला, म्हणजे मला ओवाळायचे, नवे कपडे घ्यायचे. काहीतरी गोडधोडाचे जेवण करायचे...
इंदिरा संतांकडील चंद्रमौळी हसू
मी कराडला कॉलेजात शिकत असताना दीक्षितसरांकडे म्हणजे प्रकाश संत यांच्या घरी जाणे ही आम्हाला- मला आणि माझ्या एका मैत्रीणीला पर्वणीच वाटे ! तेथे जाण्यासाठी आकर्षणे अनेक होती, पण त्यातील प्रमुख म्हणजे इंदिरा संत. त्यांचा अमलताश नावाचा बंगला होता...