हरिभाऊ हिरडे हे विविध नियतकालिकांतून कथा, कविता व वैचारिक लेखन करत असतात. त्यांनी बी ए, एम सी जे (वृत्तपत्र विद्या) पदवी मिळवली आहे. ते पोथरे, जिल्हा सोलापूर येथे राहतात. लेखकाचा दूरध्वनी 8888148083
प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. ते परिवर्तनवादी आहेत. त्यांनी समाजातील अनिष्टतेवर दंड उगारला आणि न्याय्य गोष्टी घडवून आणल्या. त्यांच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या संकल्पनेने विधवा महिलांना आनंदी जीवनासाठी आशेचा किरण दाखवला आहे...
प्रमोद झिंजाडे यांनी विधवा प्रथेतून होणारी स्त्रीत्वाची विटंबना नष्ट व्हावी यासाठी विधवा प्रथा निर्मूलनाची संकल्पना मांडली. नुसती मांडली नाही तर आचरणातही आणली. त्यासाठी त्यांनी करमाळा तहसील कार्यालय येथे जाऊन, त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या पत्नीची सौभाग्यलेणी न उतरता तिला मानसिक आधार द्यावा असे प्रतिज्ञापत्र तयार केले. त्याचेच पर्यवसान हेरवाड ग्रामपंचायतीच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या ठरावात झाले...
विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे...
प्रत्येक व्यक्तीची तिच्या गावची नदी ही मोठी आठवण असते. भले ती नदी छोटी असो नाही तर मोठी, आटलेली असो अगर वाहणारी; नदी असणारी गावे किती सुंदर आणि किती भाग्यवान!
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेला 2019 मध्ये साठ वर्षें पूर्ण झाली. त्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रांतील अभ्यासकांशी चर्चा...
हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे....
करमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर,...
बहिणाबाई चौधरी यांची ‘मोट हाकलतो एक’ ही मोटेवरील व विहिरीशी संबंधित सुंदर कविता आहे. त्या कवितेत मोटेच्या साहित्यसाधनांचा नामोल्लेख येतो. बहिणाई म्हणतात -
वेहेरीत...
सोलापूर जिल्ह्यातील मौजे पोथरे हे गाव करमाळ्यापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. ते गाव करमाळा-जामखेड व पुढे बीड असा प्रवास...