Home Authors Posts by गिरीश घाटे

गिरीश घाटे

11 POSTS 1 COMMENTS
गिरीश घाटे हे ठाण्याचे रहिवासी. ते धातुशास्त्रातील पदवीधर असून त्यांच्या डॅकोट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व आयजेन इंजिनीयर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या आहेत. घाटे यांना इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज (नवी दिल्ली) या संस्थेने उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित (2015) केले आहे. घाटे हे सोलापूर जिल्ह्यातील यावली गावी ‘प्रभाकर फाउंडेशन’च्या वतीने माध्यमिक शाळा दहा वर्षे चालवत आहेत. घाटे रोटरी संस्थेचे सक्रिय सभासद आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनावर रोटरी तत्त्वांचा मोठा प्रभाव आहे. घाटे यांची ‘सांग ना समजेल का?’ (कविता संग्रह) आणि ‘रावसाहेब’ ही (चरित्रात्मक कादंबरी) पुस्तके प्रकाशित आहेत.

न्या केशवराव कोरटकर – हैदराबाद लढ्यातील मवाळ कार्यकर्ते (Justice Keshavrao Koratkar – An Activist...

1
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर (1867-1932) हे हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातील मवाळ कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांनी बजावलेली कामगिरी शतकभराहून अधिक काळ हैदराबाद शहरी दृगोचर होत आली आहे. त्यांपैकी दोन संस्था म्हणजे विवेकवर्धिनी शिक्षणसमूह आणि महाराष्ट्र साहित्य परिषद. केशवरावांचा जन्म गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. ते निजाम राज्यात मुख्य न्यायाधीशपदापर्यंत स्वकर्तृत्वावर पोचले होते...