Home Authors Posts by अमित भगत

अमित भगत

2 POSTS 0 COMMENTS
अमित भगत हे विदर्भातील अश्मयुग व बृहदश्मयुगीन संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांनी चंद्रपुरमधील पापामियाँ टेकडी या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अश्मयुगीन स्थळाच्या बचावाकरता व संवर्धनाकरता महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच, त्यांनी 'चंद्रपूर गॅझेटिअर'करता संशोधक म्हणून लेखन केले आहे.

कथा ग्लासफर्डपेठा गावाची (Story of Glasfurdhapeta)

2
भारत देशात अशी काही गावे आहेत जी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावरून ओळखली जातात. त्या गावांशी निगडित कथा तितक्याच सुरस व रंजक आहेत. ‘ग्लासफर्ड’ हा मूळ स्कॉटिश शब्द आहे. त्याचा अर्थ ‘ग्रीन फॉरेस्ट’ असा होतो. ते गाव प्राणहिता नदीच्या तीरावरील घनदाट जंगलात आहे. इंग्रजी सत्तेच्या काळात ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे गाव वसवले त्याच्या नावावरून त्या गावास नवे नाव मिळाले. त्या अधिकाऱ्याचे पूर्ण नाव होते - चार्ल्स लॅमन्ट रॉबर्टसन ग्लासफर्ड. त्याने नागपूरजवळ काही शिलावर्तुळे शोधून काढल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ग्लासफर्डचे नाव विदर्भातील बृहदश्म किंवा महापाषाणयुगीन संस्कृती यांच्या आद्य अभ्यासकांमध्ये घेतले जाते...

कथा, सामा वेलादीच्या पराक्रमाची ! (The story of Adiwasi youth who got British Albert...

6
राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ‘जॉर्जपेठा’ व ‘ग्लासफर्डपेठा’ नावाची दोन गावे आहेत. ‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही ...