पांचाळ कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय हा सुतारकामाचा. दत्ताराम पांचाळ यांनी त्यांचे भाऊ विश्वनाथ यांच्याकडून हार्मोनियम तयार करण्याचे कौशल्य संपादन केले. त्यांनी हरिभाऊ विश्वनाथ ह्या वाद्य निर्मिती कंपनीत नोकरीदरम्यान तंतुवाद्याच्या दुरुस्तीतील आठ वर्षांच्या अनुभवानंतर स्वत:चा हार्मोनियम बनवण्याचा व्यवसाय सुरू केला...
भवानीगड हा भुईकोट ह्या प्रकारात येणारा किल्ला आहे. किल्ले भवानीगड हा शिवकाळात टेहळणी गड म्हणून महत्त्वाचा होता. त्या गडाच्या आसपास किल्ले महिपतगड आणि किल्ले प्रचीतगड हे दोन महत्त्वाचे किल्ले येतात. तसेच, राणी येसुबार्इंचे माहेर असलेले शृंगारपूर गाव आणि संभाजी राजांच्या कारकिर्दीत सरसेनापती असलेले म्हाळोजी घोरपडे यांचे कारभाटले ही गावेही हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे किल्ले भवानीगड त्या सगळ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगात येत असे...
भारताने बांगलादेशची निर्मिती पन्नास वर्षांपूर्वी पाकिस्तानला हरवून केली होती. त्यामुळे 2021-22 हे वर्ष त्याप्रीत्यर्थ सुवर्ण जयंती वर्ष म्हणून साजरे होत आहे. बांगलादेश स्वातंत्र्य संग्राम हा जगात युद्धशास्त्राच्या अभ्यासाचा विषय बनला आहे. अवघ्या तेरा दिवसांत युद्ध जिंकून एखाद्या देशाची निर्मिती व्हावी याचे ते एकमेव उदाहरण. त्या युद्धाचा कोड वर्ड होता ‘ऑपरेशन कॅक्टस लिली’ ! त्या युद्धात भाग घेतलेल्या तीन सैनिकांचे वास्तव्य देवरुख येथे आहे...
सैनिकी परंपरा घाटावर अनेक गावांत दिसते, तशी ती कोकणात नाही. रायगड येथील सैनिकी शाळा वगळता अन्य ठिकाणी तशी शाळा नाही. तरी देवरुख येथे 2018 साली शहीद स्मारक तयार करण्यात आले. ते कोकणाच्या पाच जिल्ह्यांतील एकमेव स्मारक आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहीद स्मारकच्या जोडीला तयार करण्यात आलेले परमवीर चक्र दालन आणि सैनिक मानवंदना उद्यान तर कोकणाची ओळख होऊ पाहत आहे !...
स्वतंत्र भारताने पाच युद्धे लढली. त्यांपैकी 1962 साली चीन बरोबर झालेले युद्ध हे पराभूताचा इतिहास म्हणून ओळखले जाते. तरीही त्या युद्धात भारतीय सैनिकांचे शौर्य समोर आले.
कोंडगाव-साखरपा गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा प्रसिद्ध आहे. परंपरेला शतकभरापेक्षा जास्त इतिहास आहे. त्या परिसरात अभ्यंकर, केतकर, केळकर, जोगळेकर, सरदेशपांडे, पोंक्षे, रेमणे, नवाथे ही घराणी पूर्वापार वास्तव्य करून आहेत...
साखरपा आणि कोंडगाव ह्या दोन्ही गावांचा उल्लेख साधारणत: एकत्रच केला जातो. ती दोन्ही गावे एकमेकांना लागून, जुळ्या भावांसारखी आहेत. ती गावे गड व काजळी या दोन नद्यांच्या संगमावरवसलेली आहेत.
श्री क्षेत्र मार्लेश्वर प्रतिकैलास म्हणून ओळखले जाते. ते रत्नागिरीच्यासंगमेश्वर तालुक्यात आहे. ते मारळ गावाचे आराध्य दैवत. त्या तीर्थक्षेत्राला लागून बारमाही अखंड कोसळणारा धबधबा आहे. तो म्हणजे मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा.
कोकणातील नवरात्रोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये. भुत्ये हे सरवदे समाजाचे लोक असतात. संगमेश्वर तालुक्यात ती परंपरा चारशे वर्षांची आहे.
कोकणात घराघरातून साजरा होणारा एक सण म्हणजे ‘नवान्न पौर्णिमा’. नव्याची पौर्णिमा. ‘नवान्न’ म्हणजे नवीन अन्न. त्या दिवसाला नावाप्रमाणेच महत्त्व आहे. नवान्न म्हणजे नवीन तयार...