Home Search

सिंहगड - search results

If you're not happy with the results, please do another search

आरंभकाळातील पोस्टरविचार

भारतातील पहिला बोलपट ‘आलमआरा’ हा 1931 साली निर्माण झाला. त्या आधी मूकपट 1913 पासून प्रदर्शित होऊ लागले होते. पहिल्या बोलपटानंतर, 1934 पर्यंत पुढीलप्रमाणे चित्रपट निर्माण झाल्याची नोंद आढळते. ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘मायामच्छिंद्र’ (1932); ‘सैरंध्री’, ‘सिंहगड’ (1933); ‘अमृतमंथन’ (1934) येथपर्यंतच्या चित्रपटांची पोस्टर्स जरी उपलब्ध असली तरी त्या चित्रकृती कोणाच्या त्यांचा नामोल्लेख नाही. आरंभ काळातील चित्रपट आणि त्यांचे पोस्टर कलाकार - या कलावंतांचा कार्यकाल 1924 ते 1941 असा आहे. सुबोध गुरुजी यांनी त्या कलाकार मंडळींची चरित्रे व कार्य अशा स्वरूपातील माहिती संकलित केली आहे...

रुक्ष, ओसाड बरड : पालखीचा तेवढा विसावा ! (Barren Barad)

0
माणूस ज्या भूमीत, ज्या गावात-खेड्यात जन्मला त्या भूमीचा एकेक कण त्याला काशी, गया, मथुरा ह्यासम पवित्र-पावन असतो. तेथील काटेरी बोरीबाभळींना त्याच्या हृदयी पाईन-देवदारपेक्षाही वीतभर जास्तच उंची लाभलेली असते ! गाववेशीवरील म्हसोबा, वेताळ अन बिरोबा ही तर त्याची खरीखुरी ज्योतिर्लिंगे असतात ! बरड हे माझे गाव माझ्यासाठी प्रेमाचे तशा प्रकारे आहे. अन्यथा बरड गाव नावाप्रमाणे वैराण, उजाड आहे. ते सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. ते गाव पुणे-पंढरपूर ह्या राज्य महामार्गावर फलटणपासून पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर आहे...

वृद्धांसाठी पुण्यात आभाळमाया (Abhalmaya For Elders in Pune)

वृद्धांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, वृद्धाश्रम आहेत. वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. डॉक्टर होऊन भौतिक माया वाढवण्यापेक्षा मायेने निराधार वृद्ध लोकांचा सांभाळ करावासा वाटणाऱ्या माणसांची विचारांची घडण अनन्यसाधारण असते. डॉ.अपर्णा देशमुख यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ‘आभाळमाया’ नावाचा वृद्धाश्रम सुरू केला...

दुर्गादास परब : शिस्तबद्ध, प्रामाणिक, कामसू…

0
सभोवताली नैराश्येचे वातावरण असताना नेहमीची चाकोरीबद्ध वाट सोडून नवी वाट चोखाळणारे शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि कामसू अशी प्रतिमा असणारे दुर्गादास परब. दुर्गादास यांना ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे 2023 चा बाळासाहेब घमाजी मेहेर स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवन प्रतिभा पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले आहे…

पुण्यातील बाटल्यांचा बंगला

राजेंद्र इनामदार लोकांनी इकडे-तिकडे भिरकावून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. मग त्यांनी त्या पोत्यात भरून गोळा करण्यास सुरुवात केली. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. या ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी त्यांनी आजपर्यंत ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला !

स्थलांतर ऊर्फ घरवापसी! एक टर्निंग पॉइंट (Migration can be a Turning Point)

कोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे. 
-jalakadami-heading

राष्ट्रीय जल अकादमी – जलस्रोतांचे प्रशिक्षण

‘राष्ट्रीय जल अकादमी’ ही पूर्वी ‘सेंट्रल ट्रेनिंग युनिट’ म्हणून ओळखली जायची. ती जलस्रोतांचा विकास व व्यवस्थापन यांशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम करते. संस्थेची स्थापना...
-carsole

स्वातंत्र्यलढ्यातील अग्निकुंड – अकोल्याची राष्ट्रीय शाळा

अकोल्याच्या ‘राष्ट्रीय शाळे’च्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील योगदानाला मोठा इतिहास आहे. पारतंत्र्यात असलेल्या भारतातील तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून करावे या हेतूने पश्चिम महाराष्ट्र...
_jagatil-sarv_deshanche_zende_eka-ghari_5_0.jpg

जगातील सर्व देशांचे झेंडे एका घरी!

पुण्याचे ध्वज संग्राहक श्रीकांत जोशी यांच्याकडे एकशेदहा देशांचे मूळ ध्वज आहेत. त्यांना ध्वजसंग्रह करण्याचा छंद 1990 पासून जडला. जोशी बालपणी रा. स्व. संघाच्या शाखेत...
_Gahurani_1.jpg

गहुराणी – अनुभवरूपी हिऱ्यामोत्यांची माळ

कांचन प्रकाश संगीत ह्यांचा ‘गहुराणी’ हा ललितकथा संग्रह त्यांच्या लेखनाचे वेगळेपण जपतो. त्यांचे यापूर्वी ‘अन्वयार्थ’ आणि ‘हरितायन’ हे संग्रह त्याच प्रकारचे म्हणून प्रसिद्ध आहेत....