Home Search
पुणे - search results
If you're not happy with the results, please do another search
ट्रेण्डी पुणेरी पगडी (Trendy Puneri Pagdi)
डोक्यावर फेटा किंवा पगडी घालण्याची गरज ऊन, वारा, पाऊस; तसेच, शत्रूंच्या वारापासूनही (हल्ला)डोक्याचे रक्षण व्हावे म्हणून भासली असावी. ती गरज नंतर परंपरा म्हणून मान्यता पावली. पुरुष डोक्यावर पगडी, फेटा, मुंडासे घातल्याशिवाय घराबाहेर पडत नसत. पगडी पुढे पुरुषांच्या समाजात असलेल्या दर्ज्याचेमानक बनली.
पुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर (Tulshibaug Shreeram Mandir)
नारो आप्पाजी तुळशीबागवाले हे पेशवाईतील नामांकित व कर्तबगार अधिकारी होते. त्यांनी राज्यव्यवस्था सांभाळण्याबरोबर सार्वजनिक व लोकोपयोगी कामे केली. त्यांनी देवालये बांधणे, नदीला बंधारा घालून...
तुळशीबागेशिवाय पुणे उणे !
जगात जे मिळत नाही, ते तुळशीबागेत मिळते! किंबहुना ‘पुणे तेथे काय उणे!’ या वाक्याचा संदर्भही तुळशीबागेला अनुसरून आहे. तुळशीबागेशिवाय पुणे अपुरे आहे.
एकेकाळी हिंदुस्तानचे राजकारण...
पुणेरी पगडीची प्रतिष्ठा!
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ब्रिटिशकालीन पोशाख बदलण्याचा निर्णय एकशेचौदाव्या पदवीदान सोहळ्यात, 2018 सालापासून घेतला आहे. ब्रिटिशकाळात पदवीदान सोहळ्यासाठी लाल, काळा घोळदार गाऊन आणि झुपकेदार...
शरद तांदळे – वंजारवाडी ते लंडन, व्हाया पुणे (Sharad Tandle – Vanjarwadi to London...
वंजारवाडी (जिल्हा बीड) ते लंडन व्हाया पुणे हा प्रवास आहे शरद उत्तमराव तांदळे या तरुण उद्योजकाचा आणि अर्थातच, हा प्रवास आहे एका यशोकथेचा. वंजारवाडी...
पुणे शहरातील पहिला पुतळा: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
पुणे शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात तीन पुतळे उभारले गेले. त्यात १. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मंडईमधील (लॉर्ड रे मार्केट) पूर्णाकृती पुतळा, २. त्याच वर्षी...
टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून … स्थळ चतुःशृंगी, पुणे
विकासाच्या नावाखाली भकास होणारा परिसर अनेक ठिकाणी पाहण्यास मिळतो. माणसाचा हव्यास कित्येक हिरव्यागार ठिकाणांना उजाड करत चाललाय. अशा परिस्थितीत काही मंडळी एकत्र आली आणि...
एकावन्नावे साहित्य संमेलन (Fifty First Literary Meet 1975)
कराड येथे 1975 साली भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांना लाभला. दुर्गाबाई लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्ध धर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या होत्या. त्यांचा जन्म इंदूर येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंढरपूरचे. ते नंतर बडोद्याला स्थायिक झाले. त्याकाळी बडोदा हे भारतातील एक संस्थान होते. दुर्गाबाईंचे कुटुंब सुशिक्षित होते. वडील शास्त्रज्ञ होते आणि त्यांची बहीण कमला सोहोनी भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत...
सांस्कृतिक जग कोठे हरवले?
महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?
शाळाबाह्य मुलांची उमेद वाढवणारा संकल्प !
आई-वडिलांची बळजबरी आणि भीती यापोटी सिग्नल, रेल्वे स्थानक, मॉल अशा ठिकाणी आणि अगदी रस्त्यावरदेखील कित्येक लहान मुले फुगे, गजरे, खेळणी विकताना; तसेच, भीक मागताना दिसतात. मंगेशी मून या महिला कार्यकर्तीने तशा मुलांसाठी मुंबईतून ‘उमेद संकल्प’ संस्थेअंतर्गत कामाला सुरुवात 2015 साली केली. त्यानंतर अवघ्या दहा वर्षांत, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विदर्भातील वर्ध्यात ‘रोठा’ या गावी अकरा एकरांमध्ये वसतिगृह बांधले. तेथे राहून निराधार सत्तर मुले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. त्याखेरीज पुण्याच्या कोथरूड भागात भाड्याच्या इमारतीत तसेच वसतिगृह आहे. तेथे मुलेमुली राहतात...