Home Search

धार्मिक स्थळ - search results

If you're not happy with the results, please do another search

हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक उपचारातील साम्य

1
भारतातून हज यात्रेला हजारो भाविक दरवर्षी जातात. त्यांना सरकारने देऊ केलेल्या सवलतींच्या बातम्या व त्यावर प्रतिकूल किंवा अनुकूल प्रतिक्रिया वृत्तपत्रांतून छापून येतात. मात्र त्या वार्तांतून हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक आचारात असलेले साम्य कधी समोर येत नाही. ते रामचंद्र वझे यांना सुलतान जहाँ बेगमच्या हज यात्रेच्या वृत्तांतात वाचण्यास मिळाले...

क्रांतिस्थळ, शहीद आष्टी (Shahid Ashti)

‘आष्टी’ नावाची महाराष्ट्र राज्यात तीन-चार गावे आहेत. आमचे 'आष्टी' हे विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आहे. आमच्या आष्टी गावाला खास बिरुद लावले जाते ते म्हणजे ‘शहीद...
_Bhagwati_Devi_2.jpg

कोल्हारची भगवती – नवे शक्तिस्थळ

कोल्हार-भगवतिपूर हे अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील गाव. नगर-मनमाड राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण. ते प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर कोल्हार बुद्रुक व...

वैभवशाली लातूर (Latur’s cultural affluance)

मला लातूर, कानापूर-मोहा आणि मुंबई ही गावे व्यक्तिगत जिव्हाळ्याची वाटतात. लातूर हे माझे जन्मगाव. लातूर सध्या शिक्षणवर्गांसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून गाजत असते. माझे लातूरशी भावनिक नाते आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथे झाले. बीड जिल्ह्यातील कानापूर-मोहा हे माझे वडिलोपार्जित गाव. मी उच्च शिक्षण व व्यवसायक्षेत्र म्हणून मुंबई महानगराशी ममत्वाने जोडला गेलो आहे. देश आणि राज्य स्तरावर नोंद घेता येईल असा भौगोलिक वा नैसर्गिक समृद्धीचा वारसा न लाभलेले लातूर गाव ! मात्र ते भूकंपामुळे सर्व जगास परिचयाचे झाले. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असल्याने लातूर गावाचा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन आढावा घेत आहे. लातूर गावास प्रागैतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ती तेथे प्राप्त झालेल्या शिलालेखांतून सिद्ध होते...

भगवानलाल इंद्रजी (Bhagwanlal Indraji)

पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 - 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला...

जगाचे नेतृत्व करणारी दहा शहरे (The Cities that Led the World: From Ancient Metropolis...

‘द सिटीज् दॅट लेड द वर्ल्ड: फ्रॉम एन्शन्ट मेट्रोपोलिस टू मॉडर्न मेगासिटी’ हे पॉल स्ट्रॅदन लिखित पुस्तक जगातील दहा अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या महानगरांच्या माध्यमातून जवळपास सहा हजार वर्षांच्या मानवी इतिहासाचा आढावा घेते. महानगरे ही संस्कृती-संकराची वाहक असतात. त्यांच्यामुळे मानवी संस्कृतीला आजचे रूप येत गेले आणि पुढेही येत राहील. या संस्कृतिकारणाचा शोध इसवी सन पूर्व चार हजार वर्षे बॅबिलॉन या शहरापासून सुरू होतो तो आजच्या बिजिंग आणि मुंबई या शहरांपर्यंत येऊन थांबतो. इतिहासाचा हा दीर्घ पल्ला आहे. या चित्तवेधक पुस्तकाचा परिचय करून देत आहेत नामवंत वास्तूविशारद आणि शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन...

धर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)

1
‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हा गेल्या शतकात भारतात निर्माण झालेला पंच खंडात्मक महान ग्रंथ आहे. तो महामहोपाध्याय पा.वा. काणे यांनी सिद्ध केला. त्या ग्रंथाचा आधार जगभरातील विद्वान भारतीय धर्म, नीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रंथ म्हणून घेत असतात. भारतीय संसदेनेही धार्मिक, सामाजिक, नागरी कायदे बनवताना मार्गदर्शक म्हणून त्याचा आधार वेळोवेळी घेतला आहे...

जाणता राजा अशोक (King Ashoka The Emperor)

भारतातील मौर्य साम्राज्यातील काही कर्तबगार राजांपैकी अशोकाची राजवट प्रदीर्घ व अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पण अशोक इतिहासात खूप काळ दुर्लक्षित राहून विस्मृतीत फेकला गेला होता. आधुनिक इतिहासकारांचेत्याच्याकडे लक्ष गेले.

सरोवर संवर्धिनी : गावोगावचे तलाव वाचवण्यासाठी ! (India’s Lake Culture)

'सरोवर संवर्धिनी' हा नवा, अजून फारसा न रुळलेला उपक्रम आहे. त्याचे स्वरूप ठिकठिकाणच्या लोकांनी त्या-त्या ठिकाणी एकत्र येऊन, तेथील जलस्रोतांची काळजी घेऊन जलसंवर्धनाच्या दृष्टीने आखलेला कृती आराखडा असे आहे.

कल्याणच्या तटबंदीचे अवशेष

शिवाजी महाराजांनी सागरी सत्तेचा पाया प्रथम कल्याण बंदरात १६५८ मध्ये घातला. त्या बंदराला कल्याणची खाडी म्हणून ओळखले जाते, पण कल्याण पूर्वी प्रसिद्ध होते ते,...