Home Search

चित्रकार - search results

If you're not happy with the results, please do another search

छायाचित्रकारांचा कोल्हापुरी गुरू- ज्ञानेश्वर वैद्य

2
एएस(as) ज्ञानेश्वर वैद्य हे छायाचित्रणाची पदवी मिळवणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी छायाचित्रणात AFIP ही राष्ट्रीय तर AFIAP ही आंतरराष्ट्रीय पदवी प्राप्त...

कविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे

प्रभाकर बरवे हे भारतातील श्रेष्ठ चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे भारतीय आधुनिक कलेतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कलेवरील निष्ठा व कलेशी बांधिलकी हे गुण संशयातीत...
_Bolkya_Rangacha_Chitrakar_2_0.jpg

चित्रकार ग.ना. जाधव

चित्रकार ग.ना. जाधव यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्या-त पोचले ते ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकांवरील त्यांच्या आकर्षक मुखपृष्ठांमुळे. त्या मासिकांचा महत्त्वाचा वाटा गेल्या शतकात महाराष्ट्रात...
_Bolkya_Rangacha_Chitrakar_2_0.jpg

बोलक्या रंगांचा चित्रकार : ग.ना. जाधव

2
ग.ना. जाधव या चित्रकाराच्या इंग्रजी आद्याक्षरांच्या उच्चारात ‘जी एन जे’ असा ताल आहे. त्यांचे शिक्षण झाले फक्त चौथीपर्यंत! परंतु त्यांनी असाधारण अशी व्यक्तिचित्रे रेखाटली....
carasole

व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा धडपड मंच

प्रभाकर झळके नाशिक जिल्ह्याच्या येवले गावात राहतात. ते व्यंगचित्रकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. पण ते जादूचे प्रयोग करतात, विनोदावर आधारित कार्यक्रम करतात, प्रवचन करतात...

अफलातून चित्रकार शशिकांत धोत्रे

शशिकांत धोत्रेवर तयार करण्यात आलेली शोर्ट डॉक्युमेंटरी पहा चित्र म्हटले म्हणजे कॅनव्हास व वॉटर, अॅक्रलिक किंवा तत्सम रंगांचे माध्यम... मात्र शशिकांत धोत्रे याची गट्टी जमली ती...

कलाश्रम परिवाराची दखलपत्रे (Kalashram – Unique way of paying homage)

नंदकुमार आणि नंदिनी पाटील हे मुंबईतील परळचे हरहुन्नरी जोडपे. पैकी नंदकुमार हा पत्रकार – छायाचित्रकार – वर्तमानपत्रात मजकुराची मांडणी आकर्षक करू शकणारा. त्याखेरीज त्याचे इव्हेण्ट मॅनेजमेंट वगैरेंसारखे अनंत उद्योग आणि त्या साऱ्यात नंदिनीची शंभर टक्के साथ. त्याच्या वृत्तीत परोपकार व सेवाभाव घरच्या संस्कारातून मुरले गेले आहेत. त्यामुळे त्याने उद्योग-व्यवसाय म्हणून काही केले तरी ते गुण प्रतीत होतातच. तशाच भावनेतून ती दोघे मिळून पतीपत्नी ‘कलाश्रम’ नावाची संस्था चालवतात आणि 2018 सालापासून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘दखलपत्रे’ देण्याचा कार्यक्रम करतात...

चोपन्नावे साहित्य संमेलन (Fifty-fourth Marathi Literary Meet – 1980)

प्रा. गंगाधर बाळकृष्ण ऊर्फ अण्णासाहेब सरदार हे बार्शी येथे, 1980 साली झालेल्या चोपन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. सरदार यांनी मराठी साहित्य आणि समाजसुधारणा या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांनी विसाहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये संत साहित्य, समाजसुधारणा आणि महाराष्ट्राचे सामाजिक जीवन यावर आधारित लेखन आहे.सरदार यांनी मराठी संतांचे वाङ्मय, महात्मा गांधींचे साहित्य, कार्ल मार्क्स यांचा ‘कॅपिटल’ हा ग्रंथ, तसेच अन्य वैचारिक वाङ्मय या सर्वांचे वाचन व चिंतन भरपूर केले. सरदार यांना नोकरी पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयात मराठीचे व्याख्याते म्हणून 1941 मध्ये मिळाली. तेथूनच ते मराठीचे प्रपाठक म्हणून 1968 मध्ये सेवानिवृत्त झाले...

शंकर पळशीकर: एक चिंतनशील कलावंत

शंकर बळवंत पळशीकर हे चित्रकार तर होतेच; त्याबरोबर ते उत्तम शिक्षक आणि प्रतिभावान कलासमीक्षकही होते. त्यांनी उत्तमोत्तम चित्रे निर्माण केली आणि कलेद्वारे कलाप्रेमींसमोर आत्मपरीक्षणात्मक विचार मांडले. त्यांच्या कलासाधनेतून आणि विचारांतून अंतर्मुख, चिंतनशील असा कलाविचार रसिकांसमोर येतो. पळशीकर यांची चित्रे ही दृश्य सौंदर्याच्या पलीकडे जातात. त्यांच्या चित्रांतून वैचारिक संवाद निर्माण होतो. त्यामध्ये पारंपरिक भारतीय रंगछटा, मध्यकालीन भित्तिचित्रांचे प्रभाव आणि आधुनिक कला यांचा संगम दिसतो. त्यांनी अमूर्त चित्रकला स्वीकारली, पण ती केवळ तांत्रिक नव्हती- त्यात जीवन, मन आणि अस्तित्व यांचा खोल शोध होता. त्यांची चित्रे गूढ शांतता प्रस्थापित करतात आणि कलाप्रेमींना विचार करण्यास लावतात...

मराठी माणसाचे मराठीपण हरवत चालले आहे का?

मराठी भाषकांचे राज्य स्वतंत्र भारतात स्थापन करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हा लढा उभारला गेला. महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. तेव्हापासून 1 मे हा ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. योगायोग असा, की त्याच दिवशी जगभर ‘कामगार दिन’ही साजरा होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाली ती मुख्यत: कामगार वर्गाच्या पाठिंब्यामुळे ! मराठी माणसाची आर्थिक सत्ता महाराष्ट्रात सतत कमजोर राहिली आहे. त्यामुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होऊनसुद्धा मराठी सत्ताधारी वर्गाची मुंबईवरील व त्या अनुषंगाने महाराष्ट्रावरील पकड ढिली होत गेली आहे. परिणामत: मुंबईतील व महाराष्ट्रातील मराठी माणूस सत्त्वहीन झाला आहे, मराठी माणसाची ओळख हरवली गेली आहे, मराठी माणूस सामाजिक बांधिलकी विसरून आत्ममग्न झाला आहे...