Home Authors Posts by साधना बहुळकर

साधना बहुळकर

1 POSTS 0 COMMENTS
साधना बहुळकर यांनी 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट', मुंबई येथून जी.डि.आर्ट पेंटिंगमध्ये पदवी 1979 साली मिळवली. त्या 'फिल्मस डिव्हिजन'च्या, कार्टून फिल्म युनिटमध्ये 1982 ते 1991 या काळात कार्यरत होत्या. साधना यांनी विलेपार्ले येथील 'पार्ले टिळक विद्यालया'त इंग्लिश मिडीयम सेकंडरी सेक्शन येथे चित्रकला शिक्षक पदावर 1991 पासून 2006 पर्यंत नोकरी केली. त्यांनी 'चित्रकला व चित्रकार' या विषयाच्या लेखनाची सुरवात स्तंभलेखनाने 1980 पासून केली. त्यांनी लिहिलेल्या 'चित्रायन' या माधव सातवळेकरांवरील पुस्तकास 'कोकण मराठी साहित्य परिषदे'चा पुरस्कार डिसेंबर 2005 मध्ये मिळाला. त्यांना त्यांच्या चित्रकलेसंदर्भातील लेखनाच्या योगदानाबद्दल उज्‍जैच्या 'कलावर्त-कलान्‍यास' संस्थेकडून 2006 मध्ये गौरवण्यात आले. त्यांनी मराठी विश्वकोशातील नोंदी, चित्रकारावरील कॅटलॉग्स यांसाठी लेखन केले. साधना विविध नियतकालिकांसाठी लेखन करतात.साधना यांनी 2013 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'मराठीतील दृश्यकला कोशा'साठी सहसंपादक म्हणून काम केले आहे. त्या 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई' यांच्याकडून मिळालेल्या फेलोशिपसाठी 'बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार' या विषयावर संशोधनात्मक लेखन करत आहेत.
_Bolkya_Rangacha_Chitrakar_2_0.jpg

चित्रकार ग.ना. जाधव

चित्रकार ग.ना. जाधव यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्या-त पोचले ते ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकांवरील त्यांच्या आकर्षक मुखपृष्ठांमुळे. त्या मासिकांचा महत्त्वाचा वाटा गेल्या शतकात महाराष्ट्रात...