Home Search

गणपती मंदिर - search results

If you're not happy with the results, please do another search
_Trishund_Ganpati_1.jpg

पुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर

पुण्यातील त्रिशुंड गणपती हे मंदिर समाधी व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे महाराष्ट्रात अद्वितीय ठरते. मात्र, ते त्यांचे महात्म्य व त्यांतील शिल्पकाम यांमधील असामान्यता यांच्या तुलनेने...

दिग्रसचे दत्तगुरू मंदिर

0
दिग्रस तालुक्यातील प्रसिद्ध दत्तमंदिर दत्तोबा या नावाने ओळखले जाते. ते रामकृष्ण तायडे यांच्या शेतात आहे. ते दिग्रस शहरापासून साडेबारा किलोमीटर अंतरावर बेलोरा गाव परिसरात येते. त्या शेतात दत्तमंदिर असल्यामुळे शेताचे नावही दत्तोबा असे पडले आहे. तो विदर्भाचा यवतमाळ जिल्हा. दत्तोबा हे स्थान माहूरगड आणि कारंजा लाड या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गावांपासून प्रत्येकी पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे...

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर

1
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आलेला चंद्र आकाशात वर येऊ लागतो आणि पूर्वाभिमुख असलेल्या कोपेश्वर मंदिरावर त्याची किरणे पडू लागतात. मंदिर शुभ्रधवल चंद्रप्रकाशाने उजळू लागते. शरद ऋतूमधील आल्हाददायक चैतन्यमय वातावरण आणि त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे उल्हसित करणारे भासते. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री तारकाकृती मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून चंद्रकिरण मंदिरात आत प्रवेश करतात. झरोक्याखाली असलेली रंगशिळा चंद्रप्रकाशात उजळून जाते. वर्षातून एकदा, फक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री काही घटिकांपुरता होणारा हा सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलवतो. हे प्राचीन शिव-विष्णू मंदिर शिल्पकृतींनी संपन्न आहे...

साताऱ्याचा नांदगिरी किल्ला आणि दुर्मीळ जैन मंदिर

साताऱ्यातील कल्याणगड तथा नांदगिरी हा किल्ला अपरिचित आणि दुर्गम असा आहे. तो सह्याद्रीमधील महादेव रांगेच्या एका शृंगामध्ये उभा आहे. किल्ला सातारा शहर आणि पुणे-सातारा महामार्ग यांच्या पूर्वेला येतो. किल्ल्याच्या जवळ जरंडेश्वराचा डोंगर आहे. तेथे रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर आहे. यमाई मातेचे मंदिरही जवळ, किन्हई डोंगरावर आहे. बालेकिल्ल्यावर सपाट भागात मधोमध वडाचे मोठे झाड आहे. त्यामुळे किल्ला दुरूनही ओळखता येतो...

गणपतीसंबंधी वेगळे – बरेच काही… (Ganesh Festival – Different Perspective)

1
मोसम गणेशोत्सवाचा आहे. गणपती घरी बसवणाऱ्यांकडे धामधूम चालू आहे. गणेश ही देवता आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. मराठी समाज जेथे जेथे गेला तेथे तेथे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून गणपतीला घेऊन गेला. बघता बघता गणपती अन्य समाजातही पसरला आणि आता तो केवळ भारताला बांधणाराच नव्हे तर जगाला जोडणारा देव होऊ शकतो अशी चिन्हे दिसतात...

दापोलीचे केशवराज मंदिर (Dapoli’s unique Keshavraj Temple)

0
केशवराज मंदिर हे दापोलीचे मोठे आकर्षण आहे. त्याला धार्मिक व भाविक असे महात्म्य लाभले आहेच; त्याबरोबर, पर्यटनाच्या दृष्टीनेही ते ठिकाण विलोभनीय वाटते. मंदिरातील विष्णुमूर्ती सुंदर आहे. त्या विष्णुमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म या आयुधांच्या धारण करण्याच्या क्रमावरुन चोवीस प्रकार पुराणात (अग्नी, पद्म, स्कंद) सांगितलेले आहेत...

फलटणचे जब्रेश्वर मंदिर

फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो. फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे...

श्री दत्त मंदिर: अचलपूरचा भुलभुलैया (Shri Datta Temple of Achalpur)

अचलपूर येथील दीडशे वर्षे जुने दत्त मंदिर हे भुलभुलैया मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला धार्मिकतेबरोबर ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व आहे. मंदिराचे बांधकाम शेसव्वाशे वर्षांपूर्वीचे असावे...

इस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover)

0
गणेश ही केवळ भारताची देवता राहिलेली नसून, गणपतीचा देवता म्हणून स्वीकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला आहे. त्याचे वर्णन जगातील काही संस्कृतींत मिळते. गणेश उपासना ही भारतीय संस्कृती जेथे पोचली त्या देशात प्रसारित झालेली दिसून येते...

शिवाची रूपे, त्याची मंदिरे आणि त्याची पूजा (Sect of Shaiva and it’s Traditions)

0
सृष्टी शिवाने निर्माण केली. शिवाचे स्वरूप मानवासारखे नाही. शिवाची दोन रूपे स्वरूप व तटस्थ अशी आहेत. शिवहा पती असून त्याला हर, ईश, नाथ, नंदी इत्यादी नावाने ओळखले जाते. कुंभार घटनिर्मितीसाठी काठीद्वारे चाक फिरवून निर्माण झालेल्या गतीचा, शक्तीचा साधन म्हणून उपयोग करतो, तशी सृष्टीसाठी माया व प्रकृती असते.