‘कासेगावी डाळींब’ म्हणून कासेगाव या गावाची डाळिंबे प्रसिद्ध आहेत. द्राक्षे, डाळींबे यांचे उत्पादन सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर परिसरातील शेतकरी घेतात. द्राक्षाचे पीक नाजूक आहे. हवामानातील छोट्या मोठ्या बदलाने द्राक्षांच्या पिकावर परिणाम होतो व काही वेळा तर संपूर्ण पीकच हातचे जाण्याचा धोका असतो. त्या तुलनेत डाळींब पीक कणखर आहे.
डाळिंबाचे रोप वाढू लागले, की पहिली दोन-तीन वर्षे रोपाची मुळे नाजूक असल्यामुळे वाढणाऱ्या खोडाला फाटे फुटतात आणि रोप जमिनीकडे वाकते. त्याचा फळधारणेवर परिणाम होऊ शकतो. त्या समस्येवर उपाय म्हणून पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे प्रगतीशील शेतकरी नितीन लक्ष्मण शेळके यांनी जून 2013 मध्ये नवीन प्रयोग केला. त्यांनी द्राक्षांच्या बागांना जसे मांडव वापरले जातात तसे त्यांनी डाळिंबाच्या बागेसाठी वापरण्याचे ठरवले.
त्यांनी त्यांच्या एक एकर पाच गुंठे बागेत, कृषी खात्याने बीपासून तयार केलेली रोपे लावली आणि त्या रोपांना मांडवांच्या वरच्या तारांतून फांद्यांचा आधार दिला. त्या आधारांमुळे रोपांना फाटे फुटले तरी रोपे ‘जमीनदोस्त’ होत नाहीत. तसा आधार पहिली तीन वर्षे दिला गेला, की रोपाची उंची मांडवाच्या वरच्या तारांच्या वर जाते आणि मग केवळ तेवढा आधार रोपाला पुरतो.
नितीन शेळके यांची बाग सांभाळणारा त्यांचा सहाय्यक राजू सदाशिव चव्हाण याने या बागेविषयी तपशीलवार माहिती दिली. पाणीपुरवठा ठिबक सिंचनाद्वारे केला जातो. योग्य खतांची व कीटकनाशकांची मात्रा दिली जाते. ‘तेल्या’ रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व झालाच तर तो लवकर आटोक्यात यावा म्हणून औषधयोजना केली जाते.
डाळिंबाच्या शेतीत मांडवांचा उपयोग करू लागल्यापासून उत्पन्नात वाढ होत आहे असा शेळके यांचा अनुभव आहे. त्या भागात बहुतेक सर्व शेतकरी मांडवांवरच डाळिंबाचे पीक घेऊ लागले आहेत.
संपर्क –
नितीन लक्ष्मण शेळके – 9923863770
राजू सदाशिव चव्हाण – 8308501077
– प्रसाद घाणेकर
Last Updated On – 30th Nov 2016
I am instrated dalimb
I am instrated in Dalimb project.
नितीन शेळके साहेब एकदम बेस्ट
नितीन शेळके साहेब एकदम बेस्ट
डाळिंब शेती एकनबंर आहे
डाळिंब शेती एक नबंर आहे
I proud anar.
I proud anar.
मानव न शेती क,रांची आने
मानव न शेती क,रांची आने माहीती दया
Comments are closed.