घडशी

घडशी ही एक जात आहे. त्‍या जातीचे लोक महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. वाजंत्री वाजवणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते त्‍यांच्‍या उत्पत्तीची कथा सांगतात, ती अशी – राम व सीता यांच्या विवाहाच्या प्रसंगी वाजंत्री मिळाले नाहीत. तेव्हा रामाने चंदनाचे तीन पुतळे तयार करून त्यांच्यात प्राण फुंकला. त्‍यापैकी एकाला संबळ, दुस-याला सूर व तिस-याला सनई दिली. ते तिघे घडशांचे मूळ पुरूष होते. काही ठिकाणी घडशी जात ही मांग जातीतील पोटजात मानतात. या जातीचे लोक कर्नाटक राज्‍यातही आढळतात.

समाजात बारा बलुत्‍यांच्‍या रचना अस्तित्‍वात होती, त्‍या काळी अलुतेदारांच्‍या यादीत घडशी जातीचा उल्‍लेख्‍ा आढळतो. पूर्वीच्‍या काळी अलुतेदार ठराविक हंगामात एका गावातून दुस-या गावी येत-जात असत. त्‍यांमध्‍ये गोंधळी, घिसाडी आणि घडशी जातीचे लोक प्रामुख्‍याने असत, असा उल्‍लेख मराठी विश्‍वकोषात आढळतो.

घडशी जातीत दोन पोटभेद आहेत. त्यांच्यात आते-मामे बहिणीशी लग्ने होतात.

‘घडशी’ शब्दाशी संलग्न असा दुसरा शब्द आहे ‘घडस’. घडस हे एक द्विमुखी वाद्य आहे. त्याची उजवी बाजू चामड्याने मढवतात व डावी बाजू दोरीने बांधतात. दोरी डाव्या हाताच्या तर्जनीने दाबून धरतात. चामड्याची बाजू हाताने व डावी बाजू बोटाने वाजवतात. त्या‍वेळी हाताला मेण लावतात. उजव्या हाताच्या घर्षणाने त्या वाद्यातून ‘घो’ कार उत्पन्न होतो. याला ‘डिंडिम’ असे दुसरे नाव आहे.

(संदर्भ – भारतीय संस्‍कृतिकोष, खंड ३)

About Post Author

6 COMMENTS

  1. हे घडशी नागरिक कोल्हापूर
    हे घडशी नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र वाजंत्री जात उल्लेखावर आढळतात. ते लोक सरळ व साधे जीवन जगतात. आपल्या जातीसह इतर जातीतही मिसळून राहतात. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सराईत चार रूपये कमाई करतात. त्‍याच्यावर त्यांचा प्रपंच चालवतात. त्‍यांना शासकीय मदत नाही. हे वाजंत्री म्हणजेच घडशी नागरीक आहेत.

  2. घडशी पूर्वी राजवाडे देवालयात
    घडशी हे वाद्य पूर्वी राजवाडे देवालयात धनीकांचा दारी घडशी वाजंत्री वाजवत असत. लग्नाची कामे, मिरवणूक अशा अनेक शुभ कार्यासाठी योग्य बिदागी (रक्कम) घेऊन ते स्‍वतःचे व परीवाराचे पोट भरतात.

  3. मी पण घडशी आहे मी पुणे…
    मी पण घडशी आहे मी पुणे जिल्ह्यातील भोर गावी रहातो, भोर एक संस्थान आहे रामनवमी ऊत्सवावेळी आम्ही साळुंके कुंटुंबीय परंपरागत तेथे वाद्य वाजवतो,
    फार पुर्वी पासुन राज रजवाडे घडशी जात आस्तितवास आहे
    सनई चौघडा, बॅन्ड, तुतारी वाजवणे हे आमचे मुख्य काम
    ह्यावरच आमच्या कुटुंबाचा ऊदर निर्वाह चालतो

  4. नमस्कार…..मी ही एक घडशी…
    नमस्कार…..मी ही एक घडशी समाजातील नागरिक आहे.
    घडशि या समाजाबद्दल माहिती देताना या शब्दांच्या व्युत्पत्ती कडे लक्ष द्यायला हवे. घडशी हा शब्द मूळ गडवाशी या शब्दाचा अपभ्रंश आहे. या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा सनई व चर्मवाद्य वाजवणे होता. पूर्वीच्या काळी सनईवादन हे फक्त राजे राजवाडे गड-किल्ल्यांवर व राजे महाराजांच्या दरबारी होत असे. या बहुतेक प्रसंगी सनई मंगल वाद्य वाजवायचे सेवा मिळाल्यामुळे सदर जातीचे लोक गडापासून जवळच्या अंतरावरच किंवा गडावरच राहत असत म्हणून त्यांना गडवासी हे नाव मिळाले होते. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन घडशी ही जात नाम ओळखली गेली. शिवकालीन समाजरच ने मध्ये समाजात जसे बारा बलुतेदार होते तसेच त्या वेळी त्यांना समांतर व्यवस्था असणारे बारा व त्यापेक्षा जास्त आलुतेदार जात समूह होता. त्यामध्ये घडशी ही जात प्रामुख्याने उल्लेख केलेली आहे.
    परंतु सद्यस्थितीत महाराष्ट्रात असणारा घडशी समाज हा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नगर, रायगड, कर्नाटक, गुजरात मधील काही भागात अल्प व अत्यल्प स्वरूपात विखुरलेला दिसून येतो. खऱ्या अर्थाने हा समाज आर्थिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असतानाच तुटपुंजे उत्पन्न साधनांच्या आधारे उदरनिर्वाह करत असतानाच ओबीसी जात प्रवर्गामध्ये समाविष्ट असल्यामुळे शासनाच्या योग्य न्याय वाचून उपेक्षितच राहत आहे.

  5. मि एक घडशी आहे आमची जात हि…
    मि एक घडशी आहे आमची जात हि वाई फलटण म्हसवड शिखर शिंगणापूर जावली पंढरपूर बार्शी सातारा असे अनेक गावांमध्ये लोक वस्ती आहेत आमची जात हि मागास आहे आमच्या जातीतील लोक लग्नात वाजंत्री , देवाची पूजा करून त्यावर पोट प्रपंच चालवत आहे आमच्या जातीतील मुलं शिक्षणा पासून वंचित आहे आमदार खासदार नगरसेवक यांच आमच्या जातीकडे लक्ष नाही म्हणून मुलं शिक्षणा पासून वंचित आहे व त्यांना शाशना कडून कोणतीही मदत मिळत नाही

Comments are closed.