चीनमध्ये जगातला सर्वात मोठा सागरी पूल बांधल्याचे वृत्त पुण्यातल्या दोन वर्तमानपत्रांत अगदी ठळक़पणे आले. मोठ्या फोटोसकट. दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रांत या पुलाचे तपशील मात्र अगदी वेगवेगळे आहेत! एका ठिकाणी म्हटले, हां पूल छत्तीस किलोमीटर लांब आहे तर … – संजय भास्कर जोशी बाब अगदीच साधी आहे. त्यात ना काही राजकीय ना आर्थिक ना सामाजिक. ना काही सनसनाटी!
चीनमध्ये जगातला सर्वात मोठा सागरी पूल बांधल्याचे वृत्त पुण्यातल्या दोन वर्तमानपत्रांत अगदी ठळक़पणे आले. मोठ्या फोटोसकट. दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रांत या पुलाचे तपशील मात्र अगदी वेगवेगळे आहेत! एका ठिकाणी म्हटले, हां पूल छत्तीस किलोमीटर लांब आहे तर दुसर्या ठिकाणी याच पुलाची लांबी बेचाळीस किलोमीटर दिली आहे. एका ठिकाणी याचा खर्च २.३ अब्ज डॉलर दिलाय तर एका ठिकाणी ५५.५ अब्ज पौंड! म्हणजे कितीपट फरक, ते बघा! खरे तर, बाब अगदी साधीच आहे. सहज ध्यानात आली इतकेच. हेच इतर बाबतींत होत असेल ना? माहितीच्या अचुकतेबाबत आग्रह कोण अन कधी धरणार? माहितीचा अधिकार मान्य झाला आहे अगदी कायद्याने. पण माहितीच्या अचुकतेचे काय? चीनमधला पूल सहा किलोमीटर कमी किंवा जास्त असल्याने आपल्या आयुष्यात काय फरक पडणार? त्याचा खर्च बारा हजार कोटी काय अन एक लक्ष वीस हजार कोटी काय….! एखादा आर्थिक घोटाळा दीड लाख कोटी काय आणि पावणेदोन लाख कोटी काय? आपल्या आयुष्यात काय फरक पडणार? बातम्या, माहिती, तपशील… विश्वासार्हता अपेक्षितच करायची नाही असे ठरवले तर सारेच सोप्पे, नाही का? एकदा बातमी येते, की महाराष्ट्राने कधीच घरातल्या गॅसवरचा कर माफ़ केला होता आणि किमती बंगालपेक्षा कमी होत्या. दुसर्यांदा बातमी नेमकी उलट येते. बातमी आणि मते यांत फरक असतो ना? वृत्तपत्रावर टीप लिहावी: या वर्तमानपत्रातील बातम्या आणि मतांची जबाबदारी संपादकावर नाही. कुणीच कशाचीच जबाबदारी ना स्वीकारणे सर्वोत्तम.
अर्थात सुरवातीलाच म्हटले ना, बाब अगदीच किरकोळ आहे!
संजय भास्कर जोशी
०९८२२००३४११
इमेल – sanjaybhaskarj@gmail.com