Home Authors Posts by संजय जोशी

संजय जोशी

4 POSTS 0 COMMENTS
संजय भास्‍कर जोशी हे संजय भास्कर जोशी हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. जोशी हे मूळचे एक उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकारी. त्‍यांनी अनेक वर्षे मोठ्या पदावर कामे केली. ते आयडिया कंपनीत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट असताना वयाच्या 43 व्या वर्षी त्‍यांनी पूर्णवेळ वाचन आणि लेखन करण्‍याकरता नोकरी सोडली. जोशी यांची 'नचिकेताचे उपाख्यान', 'रेणुका मृणालची उपाख्याने',' श्रावणसोहळा' या कादंबर्‍या, 'स्वप्नस्थ' आणि 'काळजातीला खोल घाव' हे कथासंग्रह, तसेच, 'आहे कॉर्पोरेट तरी' हे आत्मचरित्रपर पुस्तक अशी साहित्‍यसंपदा आहे. त्यांच्‍या लेखनाला दोन वेळा राज्य सरकारचा पुरस्‍कार प्राप्‍तझाला आहे. त्‍यांनी जे.डी सॅलिंजर यांच्या 'कॅचर इन द राय' या कादंबरीचा अनुवाद केला असून अंतर्नाद, अनुभव, ललित, म टा , लोकसत्ता वगैरे नियतकालिकात विपुल समीक्षा लेखन केले आहे. वाचन आणि वाचनसंस्कृती यांच्या वृद्धीसाठी ते अनेक प्रकल्प चालवत असतात. साधना साप्ताहिकात त्यांची 'संजय उवाच' व 'पडद्यावरचे विश्वभान' ही सदरे लोकप्रिय झाली. लेखकाचा दूरध्वनी 9822003411

बेळगावचे पुस्तकवेडे शंकर चाफाडकर

2
बेळगाव या गावाबद्दल प्रेम वाटायची कारणे लिहायची म्हटले, तर ती यादी मोठी होईल. एक जीएंनी त्यांचे पुस्तकच त्या गावाला मोठ्या डौलदार शब्दांत अर्पण केले...

‘देऊळ’ – आहे ‘अद्भुत’ तरी…

0
     कलाकृती एखाद्या बाणासारखी असते. हा बाण एकदा सुटला की तिच्यावरचे नियंत्रण कलावंताकडे उरत नाही. ‘देऊळ’ बघताना ‘लाइट’ आणि गमतीच्या मूडमधले प्रेक्षक शेवटच्या गंभीर...

बाब अगदीच साधी!

0
चीनमध्ये जगातला सर्वात मोठा सागरी पूल बांधल्याचे वृत्त पुण्यातल्या दोन वर्तमानपत्रांत अगदी ठळक़पणे आले. मोठ्या फोटोसकट. दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रांत या पुलाचे तपशील मात्र अगदी...

‘लोकराज्‍य’चा चमत्‍कार!

0
     ‘लोकराज्‍य’चा ताजा अंक पाहिला. या वाचन विशेषांकात विलासराव देशमुख, भालचंद्र नेमाडे, पृथ्‍वीराज चव्‍हाण वगैरे मंडळींचे लेख या अंकात समाविष्‍ट करण्‍यात आलेले आहेत....