सोलापूरातील रुपाभवानीचे देऊळ मोठे आहे. त्या देवळातील आतील भाग दगडी व कलाकुसरयुक्त आहे. त्या मंदिराचे बांधकाम व त्यावरील रंगीत शिखराचे काम ‘श्री रूपाभवानी भक्त मंडळ’ व ‘श्री वल्लभदास अग्रवाल’ यांच्या सहकार्याने झाले.
रुपाभवानी देवीला सुंदर पितळी मुखवटाही आहे. देवीच्या मंदिरात नवस फेडले जातात. विशेष म्हणजे मुस्लिम स्त्रीपुरुषही नवस फेडण्यासाठी आलेली दिसतात. सोलापूरात दुर्गामातेची तीन रुपे विशेष प्रसिद्ध आहेत. एक सोलापूर शहरातील रुपाभवानी, दुसरी माढ्याची माढेश्वरी देवी आणि तिसरी करमाळ्याची श्री कमला देवी.
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164