लतिका चौधरी
मोरपंखी आठवणी आखाजीच्या (अक्षय तृतीया)
अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाख शुद्ध तृतीयेस साजरा केला जातो. त्या दिवशी कृतयुगाचा आरंभ होतो असे म्हणतात. तो पवित्र दिन म्हणून विविध धर्मकृत्ये, पुण्य, दानधर्म, हवन, सत्कर्म करून पुण्यसंचय केला जातो. परशुराम जयंती त्याच दिवशी असते. चैत्रात बसवलेल्या गौराईचे विसर्जनही त्या दिवशी होते. खानदेशातील अक्षय तृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीला मुक्तिदिनच असतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपण तेव्हाच लाभते. चैत्र-वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था आपोआप आखातीच्या मुहूर्ताला जमा होते. त्यामुळे मुलीमहिलांचा आनंदोत्सवच तो...