प्रा. गंगाधर बाळकृष्ण ऊर्फ अण्णासाहेब सरदार हे बार्शी येथे, 1980 साली झालेल्या चोपन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. सरदार यांनी मराठी साहित्य आणि समाजसुधारणा या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांनी विसाहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये संत साहित्य, समाजसुधारणा आणि महाराष्ट्राचे सामाजिक जीवन यावर आधारित लेखन आहे.सरदार यांनी मराठी संतांचे वाङ्मय, महात्मा गांधींचे साहित्य, कार्ल मार्क्स यांचा ‘कॅपिटल’ हा ग्रंथ, तसेच अन्य वैचारिक वाङ्मय या सर्वांचे वाचन व चिंतन भरपूर केले. सरदार यांना नोकरी पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयात मराठीचे व्याख्याते म्हणून 1941 मध्ये मिळाली. तेथूनच ते मराठीचे प्रपाठक म्हणून 1968 मध्ये सेवानिवृत्त झाले...