संजय क्षत्रिय यांनी गणेशाची रूपे विविध प्रकारचे साहित्य वापरून साकारली आहेत. त्यांनी पांढरी पावडर आणि डिंक यांच्या साहाय्याने अर्धा इंच ते तीन इंच आकारांच्या सूक्ष्म गणेशमूर्ती साकारल्या आहेत. त्यांनी तो छंद वयाच्या अठराव्या वर्षापासून जोपासला आहे. वास्तवात ते विडी कामगाराचा पोटी जन्माला आले. घरात शिक्षणाचा संस्कार नव्हता. संजय यांचे शिक्षणही जेमतेम नववीपर्यंत झाले. त्यांनी घरांना रंग देऊन संसाराचा गाडा संभाळणे सुरू केले व त्याबरोबर, त्यांनी स्वतःचा छंदही जोपासला.
संजय क्षत्रिय नासिक जिल्ह्यात सिन्नरला बंगलीवजा घरात राहतात. त्यांचे बंधू त्याच बंगल्यात मागील बाजूस असतात. संजय त्यांच्या छंदकलेचे प्रदर्शन दरवर्षी गणपतीत सिन्नर शहरी मांडतात. ते म्हणाले, की त्यांच्याकडे त्यांनी निर्माण केलेल्या एकतीस हजार कलाकृती जमा आहेत. त्या या प्रदर्शनानिमित्ताने बाहेर येतात. त्या सर्व मांडायच्या तर दोन हजार चौरस फूट जागा लागेल. एरवी, त्या कोठे ठेवायच्या हा प्रश्नच असतो. नासिकच्या आनंद बोरा नावाच्या पत्रकाराने त्यांच्या मित्रांचे प्रदर्शन नासिकला भरवले होते, तेवढाच मूर्तीचा सिन्नरबाहेरचा प्रवास !
संजय यांनी एकतीस हजार सूक्ष्म गणेशमूर्ती बनवल्या आहेत. त्या प्रत्येक मूर्तीत साम्य आहे प्रत्येक मूर्ती वेगळी आहे. प्रत्येक मूर्तीची सोंड, डोळे, कान, हातपाय आणि मोदक या बाबी इतक्या सुबक आहेत की तीत जिवंपणा जाणवतो. सुपारी कोरून त्यात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, सुपारीवर अर्ध्या इंचाचे अकरा गणपती अशा कलाकृती पाहून संजय यांच्या हातातील जादू अचंबित करते.
संजय यांनी बारा ज्योतिर्लिंग, नाग, उंदीर, घोडे, एक सेमी ते दोन इंच पर्यंतचे हत्ती, अंबारी असलेला हत्ती – त्या अंबारीत थाटात बसलेले गणराय अशाही मूर्ती साकारल्या आहेत. खडूच्या आकाराचे मंदिर बनवून त्यात गणेशाची प्रतिष्ठापना, त्यांना खडूच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे मुखवटे आदी कृती बनवण्याची कलाही अवगत आहे.
आंब्याच्या सुकलेल्या कोयीवर अनेक प्रकारचे मुखवटे त्यांनी साकारले आहेत. अरुंद तोंड असलेल्या बाटलीमध्ये दुमजली इमारत, मंदिर, चेंडू, फळा अशा अनेक वस्तू पाहून प्रेक्षक थक्क होतो. त्यांनी सलाईनच्या चार ते पाच इंच बंद बाटलीत झाकणाच्या छिद्रातून वस्तू टाकून त्यात राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ची कलाकृती तयार केली आहे. त्यांनी ती कलाकृती भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे पाठवली. तेथून ती राष्ट्रपती भवनात पोचली. राष्ट्रपतींचे खाजगी सचिव आर.के.प्रसाद यांनी 2004 साली पाठवलेल्या पत्रात संजय यांच्या कलेची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय यांच्या सूक्ष्म मूर्तीचे प्रदर्शन ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि नाशिकचा ‘नेचर क्लब’ यांच्यातर्फे भरवण्यात आले होते. संजय यांनी प्रदर्शनात काड्यापेटीतील एक लाख वीस हजार गुलकांड्यांपासून मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिराची प्रतिकृती बनवली होती.
संजय यांना सूक्ष्म मूर्तीच्या विक्रीचे तंत्र मात्र जमलेले नाही. सूक्ष्म गणेशमूर्तीची किंमत मुंबई येथील बाजारात तीनशे ते चारशे रूपये आहे. संजय यांनी एकदा त्यांच्या सूक्ष्म मूर्ती मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी आणल्या होत्या, पण त्यांना मुंबईमधील दुकानदारांनी कमी भाव सांगितल्यामुळे संजय नाराज झाले.
संजय यांना त्यांच्या छंदाच्या दुनियेत त्यांना त्यांची पत्नी वंदना यांची मोलाची साथ असते. संजय यांच्या आगळ्यावेगळ्या कलेचा वारसा त्यांच्या मुलींनीही जपून ठेवला आहे. संजय यांच्या मुली (पूजा व अक्षदा) बाटलीवर गणेशाचे चित्र काढणे, त्याकरता विविध प्रकारच्या रंगछटा साधणे अशी कलाकारी सहज करू शकतात.
संजय बाबुलाल क्षत्रिय, 9881919740
– शैलेश पाटील
Very good
Very good
संजय क्षत्रिय कलेच्या
संजय क्षत्रिय कलेच्या प्रांतातील कलंदर!
फारच छान ऊपक्रम.. पूढेही आपण
फारच छान ऊपक्रम.. पूढेही आपण असाच छंद जोपासावा
खुप छान कला आहे.हँट्स अॉफ.
खुप छान कला आहे.हँट्स अॉफ.
Excellent work sanjay
Excellent work sanjay Kshatriya. Great artist you are. I am also very much proud of you for another reason is that you are from sinner city which is my native and birth place.
Very Nice
Very Nice
sanjay ha ek guni kalakar ahe
sanjay ha ek guni kalakar ahe. samaj madhymachahi te changla upyog kartat .
*अप्र्तिम कला साधणारा …
*अप्र्तिम कला साधणारा :अवलिया:कलकार अविस्मरणीय:**!!!!
Comments are closed.